एक्स्प्लोर

काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा दणका, 10 ऑगस्टला भाजपची दुसरी मेगाभरती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आणि काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराने कालच (1 ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आधीच खिंडार पडलेल्या विरोधी पक्षाला आता 10 ऑगस्टला आणखी मोठा दणका बसणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातल्या राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आणि काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराने कालच (1 ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आधीच खिंडार पडलेल्या विरोधी पक्षाला आता 10 ऑगस्टला आणखी मोठा दणका बसणार आहे. कारण 10 ऑगस्टला भाजपची दुसरी मेगाभरती होणार आहे. भाजपची मेगाभरती; काँग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश आधी मुलांचा मग पित्यांचा प्रवेश? विरोधी पक्षातील विशेषत: राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज मंडळी भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते भाजप प्रवेशासाठी रांगेत असल्याची विधानं भाजप नेते वारंवार करत आहेत. त्यातच आम्ही आधी नेत्यांच्या मुलांना घेतो, मग नेते आपोआप येतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात म्हणाले होते. अशाच काही मोठमोठ्या नेत्यांच्या मुलांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी 10 ऑगस्टचा मुहूर्त ठरला आहे. या मेगाभरतीत प्रामुख्याने, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नेते किंवा त्यांच्या मुलांचा समावेश असेल. मात्र पक्षश्रेष्ठींकडून याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. येत्या काही दिवसात त्यावर निर्णय होईल. त्यामुळे आता 10 ऑगस्टच्या मेगाभरतीत कोणते चेहरे घड्याळ आणि पंजाची हात सोडून कमळ हाती घेतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते भाजपमध्ये मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुराव पिचड, अकोलेचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये दाखल झाले. याशिवाय राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक, महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले तसंच माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संबंधित बातम्या 'भाजपात प्रवेश देणे आहे', भाजपच्या मेगाभरतीची खिल्ली उडवत बॅनरबाजी माझा कट्टा | विधानसभा निवडणुकीत आघाडीचे केवळ 40 आमदार निवडून येतील : गिरीश महाजन विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार : मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget