एक्स्प्लोर

मनोज धाकट्या भावासारखा, नाराजी लपवत सोमय्यांकडून कोटक यांची गळाभेट

मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांच्या पाया पडून गळाभेट घेतली.

मुंबई : युतीमधील ईशान्य मुंबईच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला असून भाजपकडून नगरसेवक मनोज कोटक यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर कोटक यांनी सोमय्यांची तात्काळ भेटही घेतली. यावेळी किरीट सोमय्यांनी आपली नाराजी लपवत आनंद व्यक्त केला. मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांच्या पाया पडून गळाभेट घेतली. मनोज माझ्या धाकट्या भावासारखा असून त्याच्या विजयाची जबाबदारी आपली असल्याचं यावेळी सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्यांच्या आशीर्वादाने ही सीट निवडून आणू, असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला. ईशान्य मुंबईची जागा देशभरात टॉप 10 मध्ये आणू, असं सांगतानाच किरीटजी आपल्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांची विकासकामं त्यांच्याच आशीर्वादाने पुढे नेऊ, असंही ते म्हणाले.
किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर मनोज कोटक
मनोज कोटक हा डायनॅमिक उमेदवार असून टॉप दहा निकालात त्यांचा निकाल लागेल. आज आनंदाचा दिवस आहे त्यामुळे कोणावर नाराजी वगैरे नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी व्यक्त केली.
VIDEO | ईशान्य मुंबईतून भाजपकडून उमेदवारी मिळवणारे मनोज कोटक कोण आहेत? | एबीपी माझा
पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी चांगल्याप्रकारे निभावली. मला कुठल्याही गोष्टीचं दुःख नाही. पक्षाने दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला, असंही सोमय्या म्हणाले. पक्षाने मला सर्व काही दिलं, पक्षासाठी काही गमवावं लागलं, तर त्याची खंत नसेल, असंही सोमय्या यांनी व्यक्त केला.
'नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जे-जे करावं लागेल, ते करणार. देशाला काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दूर ठेवण्यासाठी जे-जे करावं लागेल, ते करणार' असाही निर्धार सोमय्या यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर जाण्याचा प्रयत्न केला नाही, मीडियामध्ये पसरलेलं वृत्त खोटं आहे, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेली टीका त्यांना भोवल्याचं म्हटलं जात आहे. मनोज कोटक यांचा परिचय मुंबईत भाजपचे मुलुंड मधील विद्यमान नगरसेवक मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी 2014 साली भांडुप विधानसभेतून निवडणूक लढवली होती मनोज कोटक मुलुंडचेच रहिवासी असल्यामुळे किरीट सोमय्या यांना मुलुंड मध्येच आव्हान उभं ठाकलं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांच्या उमेदवारीस स्थानिक शिवसेनेचं समर्थन

महत्त्वाच्या बातम्या

Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Embed widget