एक्स्प्लोर

मी उद्धव ठाकरेंचे स्वागत करतो, त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घ्यावी मी सभेचे पैसे पाठवतो : नितेश राणे

Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घ्यावी, ते सभा घेणार असतील तर मी उद्धव ठाकरेंचे स्वागत करतो, शिवाय त्यांना मी सभेसाठी पैसे पाठवतो, असे आव्हान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.

Maharashtra Assembly Election 2024 सिंधुदुर्ग : दिवाळीचा सण पार पडल्यानंतर राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूरमधून प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा ही शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत चौफेर फटकेबाजी केली. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांचा धडाका होणार असल्याचे चित्र आहे. ठाकरेंच्या पुढील 13 दिवसात राज्यात 34 सभा होणार आहेत. मुंबई -ठाणे ते कोकण, मराठवाडा ते विदर्भ, उत्तर महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्रभर  सभांचा धुरळा होणार असून 13 नोव्हेंबरला कणकवली, कुडाळ सावंतवाडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. दरम्यान, याच सभेवरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत लक्ष्य केले आहे.

तर मी उद्धव ठाकरेंचे स्वागत करतो, सभेसाठी पैसेही पाठवतो-नितेश राणे

उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घ्यावी, ते सभा घेणार असतील तर मी उद्धव ठाकरेंचे स्वागत करतो, शिवाय त्यांना मी सभेसाठी पैसे पाठवतो, असे आव्हान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. कोकणात राणे आणि सामंत यांच्या जीवावर उद्धव ठाकरे ढेकर काढायचे. यांना गाड्या आम्ही विकत घेऊन द्यायचो, तेव्हा त्यांना हे चालायचं? असा सवालही नितेश राणे यांनी केलाय. 

उद्धव ठाकरेंनी आम्हाला छत्रपतींच्या प्रेमाबद्धल शिकवू नये

संजय राऊत यांची छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याची लायकी नाही. ते संजय राऊत फडणवीस साहेबांवर आरोप करत आहेत. सामनामध्ये कार्टूनच्या माध्यनातून महिलांचा अपमान करण्याचं काम सुरु आहे. मुघलांची पिलावळ महाराजांच्या स्मारकाबद्दल आम्हाला शिकवणार का? ज्याच्यामुळे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ शकले नाही, तो असीम सरोदे कोणाचा जावई आहे? अरबी समुद्रात होणाऱ्या महाराजांच्या स्मारक बाबतची याचिका मागे घे असं असीम ला सांगा. उद्धव ठाकरे 50 लाख रुपये आमच्या मालवण मधील छत्रपतींच्या मंदिरात देणार होता, त्याचा विसर त्यांना पडला आहे का? कोल्हापूरमध्ये राजेंचा अपमान झाला, तेव्हा बंटी पाटीलला का रोखलं नाही? विशाल गडच्या वेळी हे कुठे होते? त्यामुळे जानाब उद्धव ठाकरेंनी आम्हाला छत्रपतींच्या प्रेमाबद्धल शिकवू नये, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

आणखी वाचा

लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये करणार, दादांचा नवा वादा, राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget