एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साताऱ्यात आणि ठाण्यात दोनदा मतदान करा, मंदा म्हात्रेंच्या आवाहनाने वाद
नवी मुंबईत माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी 23 एप्रिल रोजी मतदारांना साताऱ्यात जाऊन नरेंद्र पाटील यांना मतदान करण्यास सांगितलं. तर पुन्हा 29 एप्रिलला ठाणे लोकसभेचं मतदान असल्याने परत येऊन शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
नवी मुंबई : नवी मुंबईतील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी चक्क मतदारांना दोन वेळा मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. साताऱ्यात शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटलांना आधी मतदान करा, मग पुढच्या आठवड्यात ठाण्यात राजन विचारेंना मत द्या, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या.
कोपरखैरणेमध्ये युतीच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असून पश्चिम महाराष्ट्रातील मोठी मतदार संख्या नवी मुंबईत वास्तव्यास आहे.
नवी मुंबईत माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी 23 एप्रिल रोजी मतदारांना साताऱ्यात जाऊन नरेंद्र पाटील यांना मतदान करण्यास सांगितलं. तर पुन्हा 29 एप्रिलला ठाणे लोकसभेचं मतदान असल्याने परत येऊन शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
शरद पवार दोन वेळा मतदान करण्याचं आवाहन करु शकतात, तर आपण का नाही करायचं? असंही मंदा म्हात्रे म्हणाल्या. या प्रकरणी आता विरोधीपक्षांनी निवडणूक आयोगाकडे मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्याची तक्रार केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement