एक्स्प्लोर

निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, नव महाराष्ट्र नऊ संकल्प अभियान

युती संदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की युती ही होणारच आणि लवकरच तुम्हाला त्या संदर्भातली बातमी मिळेल. तसेच 75 वर्ष पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना तिकीट दिलं जाणार नाही, असे ते म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्रमध्ये निवडणुका जाहीर होताच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे युतीची चर्चा करत असताना नव महाराष्ट्र नऊ संकल्प असा अभियान हाती घेतला आहे. त्यासोबतच तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉफी विथ लीडर या अभियानाला देखील सुरुवात भाजपने केली आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षात केलेल्या कामांना घराघरात पोहोचवणे हा मुख्य उद्देश्य असेल. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी आणि स्वतः मुख्यमंत्री देखील लोकांच्या घरी जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी युती संदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की युती ही होणारच आणि लवकरच तुम्हाला त्या संदर्भातली बातमी मिळेल. तसेच 75 वर्ष पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना तिकीट दिलं जाणार नाही, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या राजीनाम्यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले की त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा आणि सरकारचा काहीच संबंध नाही. जर आमच्या सरकारने असं काही केलं असेल त्यांनी आमच्या विरोधात पीआयएल दाखल करा असं आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी दिलं. या प्रकरणी  एका व्यक्तीने जनहित याचिका टाकली आणि कोर्टाने या संदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण काँग्रेसच्या काळातलं आहे. तसेच पवार कुटुंबात शांती असू दे, यासाठी मी कोल्हापूरच्या अंबाबाईला प्रार्थना करणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपचे हे नऊ संकल्प असणार आहेत 1) युवकांना स्थायी रोजगार 2) दुष्काळमुक्ती 3) प्रत्येक नागरिकाला सर्व अधिकार 4) शेवटच्या व्यक्तीचा विकास 5) सशक्त महिला 6) बळीराजाची समृद्धी 7) प्राथमिक आरोग्य/उपचार 8) पारदर्शक आणि स्वच्छ कारभार 9) महाराष्ट्रच वैभव

महत्त्वाच्या बातम्या

इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
Vidhan Parishad Election 2026 BJP: विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार, प्रत्येकाकडून पिकनिकचे पैसेही घेणार
विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार, प्रत्येकाकडून पिकनिकचे पैसेही घेणार
Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकमध्ये महायुतीला मोठे यश! भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा; संकटमोचक गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी
नाशिकमध्ये महायुतीला मोठे यश! भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा; संकटमोचक गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद
Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Embed widget