पंढरपूर : 'मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर, या रणजितसिंहाच्या 96 पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला देईल  त्याला एक हजाराचं बक्षिस देईन' रामराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर देताना माढा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पातळी सोडून उत्तर दिलं.


फलटणमध्ये झालेल्या विजयी सभेत बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांची जीभ घसरली. 'रामराजे ही बिनलग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु बोलावं लागलं' असं उत्तर निवडणूक प्रचारकाळात रामराजे निंबाळकर यांनी केलेल्या टीकेला रणजितसिंह यांनी दिलं.



माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजयमामा शिंदे यांचा पराभव करुन भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढ्याचा मतदारसंघ प्रचंड गाजला. याचं कारण म्हणजे शरद पवार यांनी माढ्याच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर माढा मतदारसंघातील उमेदवाराबाबत बराच काथ्याकूट झाला. त्यात माढ्यातील राष्ट्रवादीचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला उघडपणे मदत केली, तर त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीला सर्व ताकद पणाला लावली होती.

भाजपचे अब्जाधीश उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर 89 कोटींचं कर्ज

कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?

- सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष

- अडीच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड

- खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव

- स्वराज उद्योग समुहाची स्थापना

- स्वराज्य उद्योग समुहातून युवकांची फौज

- 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेनेच्या युतीकडून हिंदुराव नाईक निंबाळकरांना उमेदवारी

संबंधित बातम्या

विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर फायनल, संजय शिंदेंशी मुकाबला होणार

विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास