एक्स्प्लोर

सांगलीत वंचित आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याच्या रागातून भाजपची तीन तालुकाध्यक्षांना नोटीस

भाजपचे हे तीनही तालुकाध्यश सध्या वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. गोपीचंद पडळकर हे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत.

सांगली : सांगलीत भारतीय जनता पक्षाने दोन तालुका अध्यक्ष आणि एका भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षला नोटीस पाठवली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा खुलासा करा, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सांगलीत भाजपचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार नियोजनाच्या बैठकीस देखील या तीन तालुकाध्यक्ष गैरहजर होते.

त्यामुळे पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा ठपका ठेवत भाजपचे ग्रामीण सरचिटणीस सुरेंद्र चौगुले यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा तातडीने खुलासा करा, अशी नोटीस बजावली आहे. जर खुलासा केला नाही तर पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांना दिला आहे. आटपाडीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, खानापूर भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संग्राम माने आणि खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील यांना या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

भाजपचे हे तीनही तालुकाध्यश सध्या वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. कालच्या पडळकर यांच्या सांगलीतील सभेला देखील या तिघांनी हजेरी लावली होती. गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असल्याचा राग धरुन भाजपने ही नोटीस पाठवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

गोपीचंद पडळकर हे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. संजयकाका पाटील यांना पाडण्यासाठीच आपण लोकसभा लढवत असल्याचे पडळकर यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे हे तीन तालुकाध्यक्ष या नोटीसला उत्तर देणार की भाजपच्या पदाचा राजीनामा देणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Embed widget