Uttarakhand Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. या पाचही राज्यात राजकीय पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, भाजपच्या उत्तराखंड सरकारमधील अंतर्गत कलह बाहेर आला आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीच भाजपने कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. भाजपने सहा वर्षांसाठी हरक सिंह रावत यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे हरक सिंह रावत आपोआपच कॅबिनेटमधून बरखास्त झाले आहेत. या कारवाईनंतर हरक सिंह रावत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी भाजपने माझ्याशी एकदाही चर्चा केली नसल्याचे ते म्हणालेत.


हरक सिंह रावत यांच्यावर कारवाई केल्याने उत्तराकंडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी भाजपने माझ्याशी एकदाही चर्चा केली नाही. मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो नसतो तर चार वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला असता. मला मंत्री बनण्यात फारसा रस नाही, मला फक्त काम करायचे होते असे रावत म्हणाले. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसला विजयी करण्यासाठी आता मी निस्वार्थपणे काम करणार असल्याचे रावत म्हणालेत. गेल्या पाच वर्षात तरुणांना आम्ही रोजगार देऊ शकलो नाही, नेत्यांना रोजगार देण्यासाठी उत्तराखंडची निर्मिती केली आहे का? असा सवाल देखील रावत यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान रावत हे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 


मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायचे होते. मात्र, भाजपचे लोक म्हणत होते की मी दोन तिकिटे मागत आहे. मला मंत्रीपदाचा लोभ नसल्याचे ते म्हणाले. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत हरक सिंह रावत यांना पक्षातून काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. हरक सिंह रावत त्यांच्या कुटुंबियांसाठी तीन तिकिटांची मागणी करत होते. जे केंद्रीय नेतृत्वाने नाकारले होते. त्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जात आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: