UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघटनेचे (BKU) प्रमुख नरेश टिकैत यांनी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. आता या मुद्यावर नरेश टिकैत यांचे बंधू शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेश टिकैत यांनी केलेल्या घोषणेचा राकेश टिकैत यांनी इन्कार केला आहे. नरेश टिकैत यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नसल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, लोकांचा चुकीचा गैरसमज झाला असल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार राजपाल बल्यान यांनी नरेश टिकैत यांची भेट घेतली होती. त्यानंतर नरेश टिकैत यांना समर्थन दिल्याचे समोर आले होते. याच मुद्यावरुन राकेश टिकैत या प्रश्न विचारण्यात आले. त्यानेी त्यांनी सांगितले की, आम्ही अद्याप कोणालाही समर्थन दिलेले नाही आणि आम्ही लवकरच आमच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे याची माहिती देऊ. विविध पक्षांचे नेते गावागावात पोहोचत आहेत. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवा, असे सर्वांना सांगितले जात आहे. तुमच्या घरी कोणी आले तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले जाते. आम्ही कोणाला मत द्यायचे हे सांगत नसल्याचे यावेळी राकेश टिकैत म्हणाले.
आम्ही कोणालाही समर्थन देणार नसल्याचे ठरवले आहे. कारण सर्वांनी माहित आहे की, या निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा ते. त्यामुळे समर्थन दिल्याच्या ज्या बातम्या येत आहे त्या चुकीच्या आहेत. लोकांचा याबाबत काहीतरी गैससमज झाला आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवावी असे राकेश टिकैत यावेळी म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय लोक दल आणि समाजवादी पक्षाने या विधानसभा निवडणुकीत युती केली आहे. शनिवारी या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर केली होती. या यादीतील सर्व उमेदवार आरएलडीचे आहेत. त्याआधी गुरुवारी 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत 26 जागांवर आरएलडीचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: