ठाणे : ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील कलगीतुरा संपायचे नाव घेत नाही, शनिवारी एका कार्यक्रमात पुन्हा पक्षनेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्योरोप करण्यात आले. पुन्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊनही एकमेकांवर शरसंधान साधले होते. आत आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सेनेचे खासदार आणि महापौर यांना लक्ष्य केले आहे.


खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर 'वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही' अशी वैयक्तिक टीका केली होती. ज्यानंतर आता 'बापाची चप्पल आली, म्हणजे बापाची अक्कल येत नाही' असा टोला परांजपे यांनी श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी महापौरांना दिलेली नारद मुनींची उपमा ही योग्य होती असं म्हणत महापौर हे कलियुगातील नारद असल्याची टीका परांजपे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर केली आहे. येणाऱ्या काळात उर्वरित प्रकल्पांची टाइम लाईन देखील खासदारांनी द्यावी असे आवाहन परांजपे यांनी केले आहे. तसेच पुलाचे काम अर्धवट असताना देखील पुलाचे उदघाटन केल्याने लोकांना त्रास होतोय अशी टीकाही त्यांनी केली. 


महापौर मस्केंचंही प्रत्युत्तर


आनंद परांजपे यांनी केलेल्या टीकेनंतर महौपर मस्के यांनीही त्यांना प्रत्युत्तर केलं आहे. ते म्हणाले, 'आनंद परांजपे यांनी मला पक्ष निष्ठा शिकवू नये'. तसंच  वैयक्तीक टिका न करण्याचा एकनाथ शिंदे यांनी दिलेला सल्ला नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी पाळला नाही असा आरोप आनंद परांजपे यांनी केला. त्यावर मस्के म्हणाले, 'आम्ही त्या सल्ल्याचे पालन करत होतो मात्र राष्ट्रवादीकडून (जितेंद्र आव्हाड) पत्रकार परिषद घेतली आणि खासदार श्रीकांत शिंदे याची परिपक्वता काढली. तसेच पुन्हा नारदाचा उल्लेख केला. म्हणून आम्हालाही पत्रकार परिषद घ्यावी लागली. जर जितेंद्र आव्हाड यांनी परिपक्वता काढली नसती आणि नारद मुनीचा मुद्दा काढला नसता तर आम्हीही पत्रकार परिषद घेतली नसती.' पुढे मस्के म्हणाले, 'तुम्ही ठिणगी लावावी आणि आग भडकू नये अशी अपेक्षा करायची हे चूक आहे. तुम्ही ठिणगी लावली तर आम्ही शिवसेना आहोत भडकणारच. तसंच 'मी शिवसेनेत आहे म्हणून काम करताना, परमार्थ करतो. पक्ष वाढवणे, पक्षाचे नाव वाढवणे हे माझे कर्तव्य आहे. मी मी मग्रूर नाही मात्र जनतेच्या पाठिंब्याचा गर्व आहे.' असंही मस्के म्हणाले.


हे ही वाचा:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha