BJP Candidate list for Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी (VidhanSabha Election) भाजपकडून (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया अशोक चव्हाण () यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.


भाजपच्या यादीत 13 महिलांचा समावेश


श्रीजया अशोक चव्हाण - भोकर
अनराधाताई अतुल चव्हाण - फुलंब्री
सीमाताई महेश हिरे - नाशिक पश्चिम
सुलभा  गायकवाड - कल्याण पूर्व
 मंदा विजय म्हात्रे - बेलापूर 
मनीषा अशोक चौधरी - दहिसर
गोरेगांव - विद्या ठाकूर
माधुरी सतीश मिसाळ - पर्वती 
मोनिका राजीव राजले - शेगाव
प्रतिभा पचपुते - श्रीगोंदा
नमिता मुंदडा - केज
श्वेता महाले - चिखली
मेघना बोर्डीकर - जिंतूर


जो मतदारसंघ मी इतकी वर्ष सांभाळला... - अशोक चव्हाण


श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. लेकीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे खासदार आणि श्रीजया यांचे वडील अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की,
श्रीजयाची ही पहिलीच निवडणुक असणार आहे. मला आनंद आहे की ती आतापर्यंत सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करत होती, पण आता विधानसभेच्या दृष्टीकोनातून जनमानसाची सेवा करण्याच्या उद्देशाने ती ही निवडणूक लढवेल. जनमानसाची साथही तिला या निवडणुकीसाठी मिळेल. याआधीही ती या मतदारसंघात चांगलं काम करत होती आणि आता उमेदवार या नात्याने तिला काम करायला अधिक बळ मिळेल. मला खात्री आहे, जो मतदारसंघ मी इतकी वर्ष सांभाळला आणि जोपासला तो ती नक्कीच चांगल्या पद्धतीने सांभाळेल. 


 चव्हाण कुटुंबियांनी हा मतदारसंघ जोपासला - अशोक चव्हाण


श्रीजया जिंकवण्यासाठीची रणनीती काय असेल यावर बोलताना अशोक चव्हाणांनी म्हटलं की, शेवटी काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागेच लोकं उभी राहतात. या मतदारसंघात जवळपास 40 वर्षांपेक्षा जास्त काळ चव्हाण कुटुंबियांनी मतदारसंघ जोपासला आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, येत्या काळामध्ये ती चांगलं यश मिळवेल...


दरम्यान भाजपच्या पहिल्या यादीमध्ये एकूण 99 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हा त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातूनच रिंगणात उतरणार असून चंद्रशेखर बावनकुळेही कामठी मतदारसंघातून रिंगणात आहेत. भाजप एकूण 154 ते 156 उमेदवारांना संधी देणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यात आता भाजपने एकूण 99 उमेदवारांना संधी दिली आहे. 



ही बातमी वाचा : 


BJP First candidate list For Maharashtra Vidhansabha : मोठी बातमी : भाजपची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट