Continues below advertisement


Bihar Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD) ला मोठा धक्का बसला आहे. महागठबंधनाचा मुख्यमंत्री चेहरा असलेले तेजस्वी यादव यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण मतदारांनी त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. महागठबंधनला 35 तर राष्ट्रीय जनता दल पक्षाला 25 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलने या निवडणुकीत 50 यादव आणि 18 मुस्लिम उमेदवार दिले होते, तरीही निकाल अत्यंत निराशाजनक राहिले. परंपरागत MY (Muslim-Yadav) समीकरण या वेळी तुटताना स्पष्ट दिसले.


1) मुस्लिम मतदारांचा आरजेडीवरील विश्वास कमी (AIMIM Effect)


या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी ओवैसींच्या AIMIM ला समर्थन दिले. अनेक मुस्लिम बहुल मतदारसंघांत AIMIM उमेदवारांनी घेतलेली मतं ही राष्ट्रीय जनता दलच्या पराभवास कारणीभूत ठरली. त्याचा थेट फटका महागठबंधनाला बसला.


2) मुस्लिम मतांचे JDU कडे झुकणे (Muslim Votes In Bihar)


काही जागांवर JDU आणि RJD चे मुस्लिम उमेदवार आमनेसामने होते. अशा सीट्सवर मोठ्या प्रमाणात मुस्लिम मत JDU कडे वळले. नीतीश कुमार यांच्या योजनांचा फायदा या समूदायातील मतदारांनी मान्य केल्याचे संकेत मिळाले.


3) यादव मतदारांची नाराजी (Yadav Vote Bank In Bihar)


यादव मतदार हे आरजेडीचे सर्वात मजबूत आणि पारंपरिक आधारवड मानले जातात. मात्र या वेळी अनेक यादवबहुल जागांवर यादव मतं मोठ्या प्रमाणात विखुरली गेली. जातीय पातळीवरील असंतोष आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळे आरजेडीची मते कमी झाली.


4) जनसुराज पक्षाचा परिणाम (Prashant Kishor Factor)


प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीने अनेक मतदारसंघांत चांगली मते मिळवली. त्यांचे उमेदवार जिंकले नाहीत पण त्याचा फटका हा राष्ट्रीय जनता दलच्या उमेदवारांना बसल्याचं दिसून आलं. याचा सर्वाधिक फटका महागठबंधनाला बसला.


5) नीतीश सरकारच्या योजनांचा परिणाम (Bihar Govt Schemes)


केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, विशेषतः महिलांसाठी आणि EBC/OBC वर्गासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमुळे अनेक अपारंपरिक मतदान NDA कडे आले. यादव आणि इतर काही पारंपरिक RJD समर्थक वर्गांमध्येही या योजनांचा प्रभाव दिसला. परिणामी MY समीकरणाची ताकद कमी झाली आणि NDA ला मोठा फायदा झाला.


या निवडणुकीत प्रथमच स्पष्टपणे दिसले की बिहारचे पारंपरिक जातीय गणित बदलले आहे. आरजेडीचा मुख्य आधार असलेले मुस्लिम आणि यादव मतदार त्या पक्षापासून मोठ्या प्रमाणात दूर गेले. AIMIM, JDU आणि जनसुराज यांनी निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे आरजेडीचा पराभव फक्त संघटनात्मक नसून सामाजिक समीकरणांमध्ये झालेल्या बदलाचाही परिपाक असल्याचं चित्र आहे.


ही बातमी वाचा: