Bihar MIM MLA List  नवी दिल्ली:बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वातएनडीएनंबिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलं आहे. भाजप सध्याच्या आकडेवारीनुसार 89 जागांवर आघाडीवर आहे, त्यापैकी 77 जागांवर विजय मिळवला आहे. तर, जदयू85 जागांवर आघाडीवर असून त्यांच्या 63 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.

ऑल इंडिया मजलीसइत्तेहादूलमुस्लिमीन म्हणजेच एमआयएनं बिहार विधानसभा निवडणुकीत 2020 च्या निवडणुकीप्रमाणं यंदाही सहभाग घेतला होता. एमआयएमनं गेल्या निवडणुकीप्रमाणंयावर्षी देखील कामगिरी केली आहे.

असदुद्दीनओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला सीमांचल भागातून 5 जागांवर विजय मिळाला होता. यंदा त्याच भागात एमआयएमनं पुन्हा दमदार कामगिरी केली आहे.

एमआयएमनं बिहारमधील चार जिल्ह्यातील 24 विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. अरारिया, कटिहार, कृष्णगंजआमिपूर्णिया या जिल्ह्यांमध्ये एमआयएमनं निवडणूक लढवली. या जिल्ह्यातील मतदारासंघांमध्येमुस्लीम समाजाची लोकसंख्या अधिक संख्येनं आहे.

एमआयएमला कोणत्या मतदारसंघात विजय मिळाला?

जोकीहाट, बहादूरगंज, कोछधमन, अमौर आणि बैसी या पाच विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत.

चोकीहाट विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे मोहम्मद मुर्शीदआलम यांनी जदयूच्यामंझरआलम आणि शहनवाझ यांचा पराभव केला. जनुसराजचेसरफराजआलमतिसऱ्या स्थानी राहिले. तर राजदचेशहानवाझ चौथ्या स्थानावर फेकले गेले. मोहम्मद मुर्शीदआलमन यांना 83737 मतं मिळाली. त्यांनी 28803 मतांनी विजय मिळवला.

बहादूरगंज विधानसभा मतदारसंघात मोहम्मद तौसिफआलम यांनी काँग्रेसच्या मोहम्मद मसावारआलम यांना 28726 मतांनी पराभूत केलं.

कोछधामण विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद सरवारआलम यांनी राजदच्यामुजाहिदआलम यांचा पराभव केला. एमआयएमच्यासरवारआलम यांना 81860 मतं मिळाली. काँग्रेसच्या मुजाहिदआलम यांना 58839 मतं मिळाली. भाजपच्या बिना देवी यांना 44858 मतं मिळाली.

अमौर विधानसभा मतदारसंघात एमआयएमचेअख्तरुल इमान यांनी जनता दल संयुक्तच्यासबाजफार यांना पराभूत केलं. एमआयएमचे उमेदवार या मतदारसंघात 38928 मतांनी विजयी झाले. अख्तरुल इमान यांना 100836 मतं मिळाली.

बैसी विधानसभा मतदारसंघात गुलाम सरवर यांनी भाजपच्या विनोद कुमार यांचा पराभव केला. या मतदारसंघात राजदचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले. गुलाम सरवर यांना 92766 मतं मिळाली. तर, विनोद कुमार यांना 65515 मतं मिळाली.

बिहारमधील यशाबाबत ओवेसी काय म्हणाले?

असदुद्दीनओवेसी यांनी सीमांचलच्या लोकांचे आभार मानले आहेत. एमआयएमच्या5 उमेदवारांनी विजयी केल्याबद्दल आभार मानतो, असं ओवेसी म्हणाले. सीमांचलसाठी11 वर्षांपासून लढा सुरु केला आहे, तो अजूनही सुरु आहे, असं ओवेसी म्हणाले. बिहारमध्ये एनडीए जिंकेल अशी आशा होती, मात्र 200 जागा मिळतील असा अंदाज नव्हता. बिहारच्या जनतेचा जनादेश आपण मनापासून स्वीकारला पाहिजे, असं ओवेसींनीम्हटलं. यावेळी त्यांनी नितीशकुमारयांचं देखील अभिनंदन केलं.

दरम्यान, 2020 च्या विधानसभा निवडणकीतएमआयएमचे पाच आमदार निवडून आले होते. त्यापैकी चार आमदारांनी 29 जून 2022 ला एमआयएमची साथ सोडत राजदमध्ये प्रवेश केला होता. त्यावरुन अनेकदा असदुद्दीनओवेसी यांनी राजदवर टीका केली होती. मात्र, 2025 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमनं पुन्हा 24 उमेदवार उभे करत 5 जागांवर विजय मिळवला आहे.