Bihar Election Eesult 2025 : आरजेडीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी त्यांच्या पारंपरिक राघोपूर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तेजस्वी यादव यांनी भाजपच्या सतीश कुमार यांचा 14 हजार मतांनी पराभव केला. एक वेळ अशी होती की तेजस्वी यादव पिछाडीवर होते, त्यांचा पराभव होतो की काय अशी परिस्थिती होती. शेवटी तेजस्वी यादव यांनी विजय मिळवला.
तेजस्वी यादव – 1,18,597 मतं
सतीश कुमार – 1,04,065 मतं
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तेजस्वी यादव पिछाडीवर पडले होते, निकाल सातत्याने वर खाली होत होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात तेजस्वी यादवांनी पुन्हा आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला.
Tejashwi Yadav Raghopur Result : कुटुंबाचा पूर्ण जोर राघोपूरमध्ये
यंदाच्या निवडणुकीत राघोपूरमध्ये तेजस्वी यादव यांच्यासमोर भाजपने मोठं आव्हान उभं केलं होतं. तसेच यादव परिवाराचे पारंपरिक मतदार असलेला यादव समूदाय मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे संपूर्ण यादव परिवाराला राघोपूरमध्ये ठिय्या मांडावा लागल्याचं दिसून आलं. माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मीसा भारती, रोहिणी आचार्य या सर्वांनी राघोपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला.
Raghopur Election Result : लालू परिवाराची परंपरा कायम
राघोपूर सीट लालू यादव यांच्या कुटुंबाची परंपरागत जागा मानली जाते. या आधी या मतदारसंघातून लालू प्रसाद यादव हे 1995, 2000 साली निवडून आले होते. त्यानंतर राबडी देवींनी या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. त्याच्यानंतर तेजस्वी यादव यांनी 2015, 2020, 2025 असा सलग तीन वेळा विजय मिळवला. 2010 मध्ये भाजपचे सतीश राय या मतदारसंघातून जिंकले होते, पण त्यानंतर पुन्हा लालू परिवाराचा दबदबा कायम राहिला.
Maharashtra Pattern In Bihar : बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न
बिहारच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत महागठबंधनला पराभवाची धूळ चारली आहे. मात्र या निवडणुकीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसून आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआला 50 जागांचा आकडाही ओलांडता आला नव्हता.
ठाकरेंच्या पक्षाला 21, काँग्रेसला16 तर, पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या होत्या. त्याप्रमाणेच बिहारमध्ये महागठबंधनमधील आरजेडीला 24 तर, काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारं संख्याबळ विरोधकांना गाठता आलेलं नाही.
महाराष्ट्रात राबलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला होता. त्याप्रमाणे बिहारमध्येही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना राबवण्यात आली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा एनडीएला निवडणुकीत मिळाला आहे.
ही बातमी वाचा: