Bihar Mahua Election Result 2025:  बिहारमध्ये (Bihar Election 2025) मतदारांच्या कौल जवळ जवळ निश्चित झाला आहे. बिहारमध्ये नीतीश-मोदी-चिरागच्या एनडीएची त्सुनामी आली. 243 पैकी 203 जागा एनडीएनं जिंकल्या आहेत. राजद आणि काँग्रेसचं गठबंधन अक्षरश: वाहून गेलं. बिहारच्या जनतेनं, विशेषत: बिहारमधील महिला मतदारांनी एनडीएच्या पारड्यात मतांचं भरभरुन दान टाकलं. तर दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू यादव यांचे मोठे पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे (JJD) प्रमुख तेज प्रताप यादव यांना महुआ (Mahua Election Result 2025) मतदारसंघातून मोठ्या पराभवाला समोर जावं लागले आहे.

Continues below advertisement


Tej Praatap Yadav : तेज प्रताप यादव यांचा ब्बल 51, 938 मतांनी पराभव


तेज प्रताप यादव यांनी महुआ मतदारसंघातून तब्बल 51, 938 मतांनी पराभव पत्कराव लागलाय. त्यांना 35, 703 मते मिळाली. चिराग पासवान यांच्या पक्षाचे उमेदवार संजय कुमार सिंह यांना एकूण 87, 641 मते मिळाली आणि ते 44, 997 मतांनी विजयी झाले. राजदचे मुकेश कुमार रोशन 42, 644 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आले.


खरं तर, राजदचे मुकेश रोशन या मतदारसंघातून आमदार होते. ते जिंकतील असे मानले जात होते. मात्र त्यांच्या पराभवानंतर आता अशी चर्चा आहे की तेज प्रताप यादवमुळे मुकेश रोशन यांचा पराभव झाला. राजदची मते मुकेश रोशन आणि तेज प्रताप यादव यांच्यात विभागली गेली, ज्यामुळे तिसऱ्या पक्षाचा विजय झाला.


Mahua Election Result 2025: दोघांच्या लढतीत चिराग पासवानच्या मोहऱ्याने एकहाती मैदान मारलं!


बिहारमधील महुआ मतदारसंघात तेज प्रताप यादव आणि मुकेश रोशन यांच्यात चुरशीची लढत होती. तेज प्रताप दुसऱ्यांदा विजयी होतील की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. तेज प्रताप यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू यादव यांचे मोठे पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे (JJD) प्रमुख असून त्यांनी राजदमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि बिहारचे आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. 2025 मध्ये, सततच्या वाद, अनुशासनहीनता आणि पक्षाच्या विचारसरणीपासून वेगळेपणामुळे, राजदने त्यांना सहा वेळा पक्षातून काढलेय . यावेळी, तेजस्वी यादव महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मात्र त्यांना दारुण पराभवाला समोर जावं लागले आहे.


Tej Praatap Yadav : तेज प्रताप यादव जेजेडीचा एकमेव प्रमुख चेहरा 


राजदपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी जेजेडी (जनशक्ती जनता दल) हा एक नवीन पक्ष स्थापन केला आणि या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष 10-15 जागा जिंकेल असा दावा केला आहे. किंबहुना, जेजेडीची तळागाळातील संघटना आरजेडी आणि जेडीयू इतकी प्रभावी नाही. जेजेडीचा एकमेव प्रमुख चेहरा तेज प्रताप यादव आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत तेज प्रताप यादवसाठी हि निवडणूक निर्णायक ठरते आहे.


Bihar Mahua Election Result 2025:  तेज प्रताप यादव महुआ येथून निवडणुकीच्या रिंगणात


तेज प्रताप यादव यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी आपला पक्ष स्थापन केला होता. त्यांनी बिहारमधील महुआ विधानसभा जागेवरून निवडणूक लढवण्याचा त्यांचा इरादा आधीच जाहीर केला होता. या जागेवर त्यांचा सामना सध्याच्या राजद आमदाराशी आहे. तेज प्रताप यादव 2015 मध्ये महुआ मतदारसंघातून विजयी झाले आणि विधानसभेत पोहोचले. 2020 मध्ये त्यांनी हसनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तिथेही विजय मिळवला. सध्या ते 2025 च्या बिहार निवडणुकीत पुन्हा महुआ विधानसभा जागेवरून निवडणूक लढवली आहे.


आणखी वाचा