Horoscope Today 14 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 14 नोव्हेंबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरीच्या ठिकाणी हलकेफुलके वातावरण राहिल्यामुळे काम करावेसे वाटेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कामाऐवजी इतर गोष्टींमध्ये वेळ जास्त जाईल, स्वतंत्र काम करण्यापेक्षा सामूहिक काम करण्याची मनस्थिती निर्माण होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाल्यामुळे थोडे डोलायमान अवस्थेत राहाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज घरामध्ये एकमेकांमध्ये असलेली मत भिन्नता थोडा ताण-तणाव निर्माण करेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज सर्व बाबतीत थोडे सबुरीचे धोरण स्वीकारा, तरुण वर्गाला हवेत उडायला लावणारे ग्रहमान आहे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज मैदानी खेळ खेळणाऱ्यांनो, आपली कला सिद्ध करता येईल, महिलांनी मानापमानाच्या जंजाळात अडकू नये
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज मन थोड्या लहरी आणि मानसिक पातळीवर अस्वस्थ राहिल्यामुळे निराश वाटेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कडू कारले तुपात घोळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच राहते, याचा अनुभव प्रकर्षाने आज घेणार आहात
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज सर्व परिस्थितीत डोकं शांत ठेवून मार्ग काढावा लागेल, नोकरी व्यवसायात उत्तम संधी येऊन सुद्धा संघर्षात्मक परिस्थिती राहील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज नव्या वाटा साद घालतील असा विश्वास ठेवा, त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रामध्ये आपला ठsa खोलवर उठवणार आहात
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या मूडी स्वभावाला थोडा आळा घाला, काल्पनिक चिंतांमुळे कामाचा वेग मंदावेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी, तो अपरिहार्य आहे हे समजून घ्या.
हेही वाचा
Weekly Horoscope: नोव्हेंबरचा तिसरा आठवडा भाग्याचा की टेन्शनचा? मार्गशीर्षची सुरूवात, पैसा, करिअर, प्रेम जीवन? कोण होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
