एक्स्प्लोर

Bhiwandi Mayor Election 2026: नारायण चौधरीच भिवंडी महापौरपदी विराजमान, भाजपला मोठा धक्का

Bhiwandi Mayor Election 2026: दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आज झालेल्या भिवंडी महानगरपालिकाच्या महापौरपदी नारायण चौधरी विजयी झाले.

Bhiwandi Mayor Election 2026: दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आज भिवंडी महानगरपालिकात महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत (Bhiwandi Mayor Election 2026) भाजपचे बंडखोर नारायण चौधरी (Narayan Chaudhari) विजयी झाले. स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या प्रक्रियेनंतर हात वर करून मतदान घेण्यात आले आणि चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला मोठा धक्का दिला.

महापौरपदासाठी एकूण 10 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी नारायण चौधरी यांचे दोन अर्ज होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यापैकी एक अर्ज ग्राह्य धरला. माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील पोलीस एस्कॉर्टने येत असल्याने वेळ वाढवण्याची मागणी झाली; मात्र प्रक्रिया थांबवण्यास नकार देण्यात आला.

अखेरीस 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, ज्यामध्ये कोणार्कचे मयुरेश पाटील, प्रतिभा पाटील, शिंदेसेनेचे बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे, काँग्रेसचे तारिक मोमीन, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांचा समावेश होता. त्यामुळे अंतिम लढत त्रिकोणी झाली. नारायण चौधरी (काँग्रेस-राष्ट्रवादी सेक्युलर फ्रंट समर्थित), विलास पाटील (शिवसेना – शिंदे गट), स्नेहा पाटील (भारतीय जनता पार्टी) यांच्यात लढत झाली. 

Bhiwandi Mayor Election 2026: ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली

नारायण चौधरी हे मूळचे भाजपचे बंडखोर नेते आहेत. सुरुवातीला त्यांचे नाव भाजपकडून चर्चेत होते; मात्र ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांनाच महापौरपदाचा अधिकृत उमेदवार घोषित करत व्हीप जारी केला.

दुसरीकडे भाजपने स्नेहा पाटील यांच्यासाठी, तर शिंदे गटाने विलास पाटील यांच्यासाठी पक्षादेश जारी केला. विलास पाटील न्यायालयीन कोठडीत असल्याने सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला, तरीही मतदान प्रक्रिया नियोजित वेळेनुसार पार पडली.

Bhiwandi Mayor Election 2026: मतदान आणि निकाल

सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आले.

नारायण चौधरी – 48 मते

विलास पाटील – 25 मते

स्नेहा पाटील – 16 मते

सेक्युलर फ्रंटच्या एकजुटीमुळे चौधरी यांना स्पष्ट बहुमत मिळाले. त्यांच्या नावाची घोषणा होताच सभागृहात जल्लोष झाला.

Bhiwandi Mayor Election 2026: उपमहापौरपदी मोमीन तारिक बारी 

दरम्यान, उपमहापौर पदासाठी मोमीन तारिक बारी यांना 43 मते पडली असून त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. महायुतीकडे आकडे असल्याचे चित्र असतानाही ऐनवेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपचा पराभव झाला. पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि सेक्युलर फ्रंटची रणनीती यामुळे भिवंडीच्या सत्तासमीकरणात मोठा उलटफेर झाला आहे. भिवंडी महापालिकेतील ही निवडणूक केवळ महापौरपदापुरती मर्यादित न राहता, आगामी स्थानिक राजकारणासाठीही दिशादर्शक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Bhiwandi Mayor Election 2026: उमेदवारांना मिळालेली एकूण मते

नारायण चौधरी

काँग्रेस - 30
राष्ट्रवादी श.प - 12
भाजप - 6

विलास पाटील

कोणार्क विकास आघाडी - 4
शिवसेना - 12
समाजवादी - 6
भिवंडी विकास आघाडी - 3

स्नेहा पाटील 

भाजप - 16 

एक अपक्ष गैरहजर

Bhiwandi Election: भिवंडी महानगरपालिकेत आतापर्यंत विराजमान झालेले महापौर व कार्यकाळ 

1) सुरेश काशिनाथ टावरे  2002 - 2005
2) विलास रघुनाथ पाटील 2005 - 2007
3) जावेद गुलाम दळवी. 2007 -  2009
4) यशश्री राजन कडू.  2009 - 2012
5) प्रतिभा विलास पाटील 2012- 2014
6) तुषार यशवंत चौधरी 2014 - 2017
7) जावेद गुलाम दळवी 2017 - 2019
9) प्रतिभा विलास पाटील 2019 - 2022

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray On Eknath Shinde Meet मोठी बातमी : काल एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, राज ठाकरेंनी भेटींचं कारण सांगितलं

Narhari Zirwal Mantralaya Bribe Case: मंत्रालयातील लाचेची हादरवणारी कहाणी समोर येताच नरहरी झिरवाळ अ‍ॅक्शन मोडवर; खाजगी सचिवाला तातडीने केलं कार्यमुक्त

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Embed widget