Beed Khasdar, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाली. बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानले जाते, या मतदारसंघा धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. धनंजय मुंडे यांनी प्रचारावेळी सर्वाधिक आघाडी परळीतून मिळेल, असा संकल्प केला होता. त्यादृष्टीने त्यांनी व्यूहरचनाही आखली होती. भाजपसोबत हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि धनजंय मुंडे यांनी परळीत प्रचार केला. पण किल्ला अभेद्य ठेवण्यात अपयश आले. परळीत पंकजा मुंडे यांना एक लाख 41 हजार मते मिळाली होती, तर सोनवणे यांना 66 हजार मते मिळाली... पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची लीड मिळाली. 24 व्या फेरीपर्यंत सोनवणे यांना ही आघाडी तोडता आली नाही. 40 हजारांपर्यंत लीड घेतलेल्या पंकजा मुंडे यांना शेवटच्या टप्प्यात फटका बसला. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. 30 व्या फेरीअखेर पंकजा मुंडे यांच्याकडे 2,602 इतका लीड होता. शेवटच्या तीन फेरीमध्ये बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळाली. त्यांनी पंकजा मुंडे यांची आघाडी मोडीत काढत विजय मिळवला. बीड आणि गेवराई येथील मतपेट्या शेवटी होत्या, तिथेच पंकजा मुंडे यांना पराभवाचा झटका बसला.


ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झालेल्या बीड लोकसभेच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांचा विजय मिळाला. बजरंग सोनवणे यांचा बीड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे 60000 पेक्षाही जास्त मताची लीड मिळाली, त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्येसुद्धा बजरंग सोनवणे यांना लीड मिळाली.  केज विधानसभा मतदारसंघात यांना मिळालेल्या मताधिक्यावर बजरंग सोनवणे हे खासदार झाले. पंकजा मुंडे यांना सर्वाधिक लीड परळी विधानसभा मतदारसंघातून 74 हजार मतांची मिळाली. त्या खालोखाल आष्टी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 32000 मतांची लीड मिळाली.. माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र अवघ्या 1000 मताची लीड पंकजा मुंडे यांना मिळाली आहे. 


बजरंग सोनणे यांच्या विजयाची 5 कारणे - 


मनोज जरांगे फॅक्टर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात चालला 


आरक्षण आंदोलनाने मराठा समाज एकवटला


भाजपविरोधीत रोषाचा फायदा


मराठा समाजाने निवडणूक हातात घेतली. 


सहानभुतीचा फायदा मिळाला. 


पंकजा मुंडेंच्या पराभवाची 5 कारणे - 


जातीय राजकारणाचा सर्वात मोठा फटका


मराठसह मुस्लिम आणि दलीत मतदारांची साथ मिळाली नाही. 


पाच मतदारसंघात आमदार असतानाही फायदा नाही. 


परळी बालेकिल्ला असतानाही मोठी लीड मिळाली नाही. 


प्रचारासह त्याआधी केलेल्या विधानाचा फटका


अपक्ष आणि वंचितला एक लाख मते - 


बीड जिल्ह्यात वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांनी 50733 मते मिळवली. तर तुतारी चिन्हावर अपक्ष निवडणूक लढणारे अशोक थोरात यांना 55000 मते पडली... वंचित आणि अपक्ष उमेदवारांनी एकूण एक लाखापेक्षा जास्त मते घेतली आहेत.


कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मते मिळाली ?


परळी विधानसभा मतदारसंघ...


बजरंग सोनवणे - 66940
पंकजा मुंडे  - 141774


गेवराई विधानसभा मतदारसंघ..


बजरंग सोनवणे - 134505
पंकजा मुंडे  - 95409


माजलगाव विधानसभा मतदारसंघ..


बजरंग सोनवणे - 104713
पंकजा मुंडे - 105648


बीड विधानसभा मतदारसंघ..


बजरंग सोनवणे - 139264
पंकजा मुंडे - 77583


आष्टी विधानसभा मतदारसंघ...


बजरंग सोनवणे - 139264
पंकजा मुंडे - 77583


केज विधानसभा मतदारसंघ..


बजरंग सोनवणे - 123158
पंकजा मुंडे - 109360