Beed Khasdar, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : बीड लोकसभा मतदारसंघात दोन वेळ खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत भाजपने पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले. चेहरा बदलल्यामुळे या मतदारसंघातील समीकरणं अनुकूल होतील, असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात मात्र भाजपला पराभवाचा झटका बसला. 2009 पासून बीडमध्ये भाजपचा खासदार राहिला, हा किल्ला बजरंग सोनवणे यांनी यावेळी भेदला. पंकजा मुंडे यांच्या मदतीला आमदार आणि खासदारांची फौज होते. पाच विधानसभा आमदार, एक लोकसभा खासदार, एक राज्यसभा खासदार, एक विधानपरिषद आमदार... इतके मोठे दिग्गज असतानाही पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय. दुसरीकडे बजरंग सोनवणे यांच्या पाठिशी फक्त एकच आमदार होता. पण बीडमधील मते मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनामुळे फिरल्याची चर्चा आहे. 


बीड लोकसभेत कोण कोणते आमदार पंकजा मुंडेंच्या मदतीला


गेवराई - भाजप - लक्ष्मण पवार


माजलगाव - राष्ट्रवादी (अजित पवार)- प्रकाशदादा सोळुंके 


आष्टी - राष्ट्रवादी (अजित पवार)- बाळासाहेब अजबे 


केज - भाजप - नमिता मुंदडा


परळी - राष्ट्रवादी (अजित पवार)- धनंजय मुंडे 


सुरेश धस - विधानपरिषद आमदार 


खासदार कोण कोणते ?


प्रीतम मुंडे - बीड लोकसभा खासदार


भागवत कराड - राज्यसभा खासदार


केज, गेवराई, अष्टीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का; भाजप आमदारांच्या मतदारसंघातही पिछाडी - 


आष्टी, गेवराई, केज, माजलगाव या मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मोठा फटका बसलाय. भाजपचे आमदार असतानाही पंकजा मुंडे यांना मोठी आघाडी मिळाली नाही. काही मतदारसंघात आघाडी मिळाली, पण ती नाममात्र..  आष्टीमध्ये नेहमीपेक्षा मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये घट झाली. आष्टीमध्ये गतवेळपेक्षा निम्मी घट झाली. गेवराईमध्येही आघाडी घेता आली नाही. माजलगावमध्ये फक्त 935 मतांची आघाडी मिळाली. ज्या नेत्यांवर भाजपला आघाडी मिळवण्याचा विश्वास होता, त्या मतदारसंघात साफ निराशा झाली. पंकजा मुंडे यांना फक्त परळीमधून मोठी आघाडी मिळाली. 


पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मते मिळाली ?


परळी विधानसभा मतदारसंघ...


बजरंग सोनवणे - 66940
पंकजा मुंडे  - 141774


गेवराई विधानसभा मतदारसंघ..


बजरंग सोनवणे - 134505
पंकजा मुंडे  - 95409


माजलगाव विधानसभा मतदारसंघ..


बजरंग सोनवणे - 104713
पंकजा मुंडे - 105648


बीड विधानसभा मतदारसंघ..


बजरंग सोनवणे - 139264
पंकजा मुंडे - 77583


आष्टी विधानसभा मतदारसंघ...


बजरंग सोनवणे - 139264
पंकजा मुंडे - 77583


केज विधानसभा मतदारसंघ..


बजरंग सोनवणे - 123158
पंकजा मुंडे - 109360


2019 मध्ये काय निकाल लागला -
प्रीतम मुंडे यांना 6 लाख 78 हजार 175 मते तर बजरंग सोनवणे यांना 5 लाख 9 हजार 108 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे 91  हजार 972 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात 36 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. 


आणखी वाचा :


पंकजा मुंडेंचा पराभव का झाला, नेमकी कारणे काय? जाणून घ्या बजरंग सोनवणे यांच्या विजयाची वैशिष्ट्ये