पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा (Pune Porsche Car Accident) सखोल तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणात विशाल अग्रवालचा (Visha Agarwal) मुलगा याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना या दोघांनी तीन लाख रुपये दिले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून या दोघांना अटक केली. अटक केलेले दोन्ही कार्यकर्ते हे एका आमदाराशी संबधित असल्याची माहिती समोर येत आहे. हे वृत्त पुणे टाईम्स मिररने दिले आहे.
अटक झालेले दोघेजण एका आमदारचे कार्यकर्ते
अश्पाक मकानदार हा एका आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर ते पोलिस ठाण्यातही हजर होते. आमदाराच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. मकानदारचे हे अपघातापासून कायच चर्चेत होते. मात्र पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र काल पोलिसांनी आमदाराच्या कार्यकर्त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.
पोलीस अल्पवयीन आरोपीची कस्टडी वाढवून मागणार
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला पुढील 18 दिवसांसाठी निरीक्षणगृहामध्येच ठेवावं, अशी माहणी पोलिसांनी बाल न्याय मंडळाला केली आहे. अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातील कोठडी आज संपणार आहे. 5 जून पर्यंत अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. आज पुन्हा अल्पवयीन आरोपीची बाल सुधार गृहातील कोठीड वाढवून मागण्यात येणार आहे. पुणे पोलीस बाल न्याय मंडळासमोर पोलीस अल्पवयीन आरोपीची कस्टडी वाढवून मागणार आहे.
नेमकं काय घडलं?
विशाल अग्रवाल याच्या मुलासोबत गाडीत असलेल्या दोन मुलांचेदेखील ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचं समोर आलं होतं. भर रात्री ससूनमध्ये दोघेजण गाडीतून येऊन तावरेंच्या सोबत काम करणाऱ्या हळनोर आणि शिपाई सोबत रक्तासंबंधित डिल झाली होती. त्यानंतर या तिन्ही मुलांच्या रक्तगटाशी मिळते जुळते रक्तगट असलेले लोक शोधण्यात आले आणि त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असल्याचंही समोर आलं. त्यानंतर गाडीतून आलेले दोघं आणि रक्त देणाऱ्या तिघांचा सध्या पुणे पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस खोलात जाऊन करताना दिसत आहे. या प्रकरणाचं आता मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. पुढे कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल.
हे ही वाचा :