Sharad Pawar : 7 मे रोजी देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील महत्वाच्या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. यातीलच एक मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा ( Baramati loksabha Election) मतदारसंघ. या मतदारसघातील लढतीकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण येथू पुन्हा सुप्रिया सुळे (supriya sule) निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, 7 मे दिवशी शरद पवार हे बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगावमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याआधी पवार हे मुंबईत मतदान करत होते. मात्र, यावेळी ते आपल्या लेकीसाठी माळेगावमध्ये मतदान करणार आहेत.  


शरद पवार हे मुंबईत मतदान करणार नाहीत


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामती तालुक्यातील माळेगाव येथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याआधी शरद पवार हे मुंबईत मतदान करत होते. मात्र, यावेळी सुप्रिया सुळेंसाठी ते माळेगावमध्ये मतदान करणार आहेत. 7 मेला शरद पवार आपल्या लेकीसाठी मतदान करणार आहेत. 


बारामती लोकसभा मतदारसघातून खुद्द सुप्रिया सुळे पुन्हा निवडणूक लढवत आहे. तर त्यांच्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी खुद्द शरद पवार हेच मैदानात उतरले आहेत. त्यांनी महत्वाच्या सर्व ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहे. तर अजित पवारांनी देखील मतदारसघात बड्या राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत ही तुल्यबळ मानली जातेय. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र, कोण बाजी मारणार हे 4 जूनलाच आपल्याला कळणार आहे.


तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार


तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज पाच वाजेपर्यंतच राजकीय नेत्यांना प्रचार करता येणार आहे. कारण 7 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 


 


महत्वाच्या बातम्या:


Baramati Lok Sabha Election : एक बारामती, दोन राष्ट्रवादी, दोन चिन्ह आणि दोन पवारांच्या तोफा धडाडणार