Virat Kohli And Anushka Sharma: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला. आरसीबीने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) 23 चेंडूत 64 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय विराट कोहलीने 27 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले, मात्र यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी आरसीबीला विजय मिळवून दिला.


गुजरात विरुद्ध बंगळुरुचा सामना एम. चिन्नास्वामी मैदानावर झाला. हा सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील मैदानात उपस्थित होती. बऱ्याच दिवसांनी अनुष्का सामना पाहण्यासाठी मैदानात आली होती. अनुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ती आनंद व्यक्त करताना दिसत आहे. तसेच कोहलीने षटकार ठोकल्यानंतर अनुष्काने टाळ्या वाजवल्या. अनुष्काच्या विविध रिॲक्शन सध्या व्हायरल होत आहेत. 














विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप-


कोहलीकडे सध्या आयपीएल 2024 ची ऑरेंज कॅप आहे. त्याने 11 सामन्यात 542 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके केली आहेत. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 113 धावा. या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या कर्णधाराने ऋतुराजने 10 सामन्यात 509 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.


गुजरातचा डाव अवघ्या 147 धावांवर गुंडाळला-


नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव 19.3 षटकांत सर्वबाद 147 धावांवर आटोपला. गुजरात टायटन्सकडून शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या. याशिवाय राहुल तेवतियाने 35 आणि डेव्हिड मिलरने 30 धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजशिवाय यश दयाल आणि विजयकुमार वशाक यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. करण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.


संबंधित बातम्या:


Sunil Gavaskar On Virat Kohli: 'अरे मग तु उत्तर का देतोस'?; विराट कोहलीच्या विधानावर सुनील गावसकर संतापले, पाहा Video


Hardik Pandya: हार्दिक पांड्याची मोठी चूक झाली...; शेन वॉटसन अन् ग्रॅमी स्मिथने सुनावलं, सगळं बोलून टाकलं!


IPL 2024: विराट कोहलीच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली; बंगळुरुच्या विजयापेक्षा त्याचीच चर्चा रंगली!