मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक (Baramati Lok Sabha Election Result) चर्चेत होती. बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी पवार कुटुंबातील व्यक्तींमध्ये लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) लोकसभेच्या रिंगणात होत्या. बारामतीच्या मतदारांनी सुप्रिया सुळे यांना विजयी केलं. बारामतीत विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा निवडणुकीच्या विजयाबाबत प्रश्न विचारण्यात आले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल देखील सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आले.  


सुप्रिया सुळे यांना बारामतीमधील प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी राम कृष्ण हरी असं म्हटलं. यानंतर अजित पवार यांच्याबाबत देखील सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला असता  त्यांनी पुन्हा एकदा राम कृष्ण हरी असं म्हटलं. 


बारामतीच्या सर्व मतदारांचे मी आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मला असं वाटतं की संघर्ष, आयुष्यात कधीही खचून जायचं नाही हे कुणापासून शिकायचं असेल तर शरद पवार यांच्याकडून शिकते. गेले दहा अकरा महिने केसं गेलं हे सर्वांनी पाहिलं आहे. लोकांनी साथ दिली आता जबाबदारी  वाढलीय. झालं गेलं आता गंगेला वाहिलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 



 


निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राची संस्कृती जपण्याची जबाबदारी सर्वांवर असते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. कार्यकर्ता आमच्यासोबत उभा राहिला, हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


लोकसभा निवडणुकीतील मतदानाची पूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतर अधिक बोलेन. उद्या  बारामतीला जाणार असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 


महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर 


महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मोठं यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीनं 48 पैकी 29 जागांवर आघाडी घेतलीय.  सांगलीत विशाल पाटील विजयी झाले असून ते देखील  महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. महायुतीत 18 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस 13, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 10 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 6 जागांवर आघाडी घेतली आहे.  भाजपनं महाराष्ट्रात जागांवर आघाडी घेतली आहे. तर,  एकनाथ शिंदे 6 जागांवर आघाडीवर आहेत.  अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे.  महाविकास आघाडीनं लोकसभेला महायुतीवर वर्चस्व मिळवलंय असं चित्र स्पष्ट झालंय. 


संबंधित बातम्या: 


Varsha Gaikwad : वर्षाताई तुला खासदार करुन दिल्लीला पाठवणार, उद्धव ठाकरेंचे शब्द खरे ठरले, उज्ज्वल निकम पराभूत


Mumbai North West Lok Sabha Result 2024 : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांचा घासून विजय, रविंद्र वायकरांचा अवघ्या 681 मतांनी पराभव