Bandra West Vidhan Sabha constituency Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी चांगलीच रंगली होती. पण आता विधानसभेचा निकाल समोर आले आहेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या आशिष शेलारांचा विजय झाला आहे.  दरम्यान, या निवडणुकीत वांद्रे पश्चिम (Vandre west) हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं होतं.  पण आता हा गड भाजपने राखला आहे. 


वांद्रे पश्चिम मतदारसंघात नेमकी कोणामध्ये लढत? 


या मतदारसंघात भाजपाचे दिग्गज नेते आशिष शेलार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. शेलार हे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आसिफ झकारिया यांना तिकीट देण्यात आलं होतं. ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे या जागेवर नेमकं कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं.. आशिष शेलार हे भापजपा मुंबईचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ही जागा जिंकणं शेलार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. तर दुसरीकडे काहीही झालं तरी यावेळी वांद्रे पश्चिम ही जागा जिंकायचीच असा निश्चय झकारिया यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता या जागेवर नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं होतं. 


2019 सालच्या निवडणुकीत नेमके काय झाले होते? 


2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाचे उमेदवार आशिष शेलार यांनी बाजी मारली होती. त्यांना येथे 74816 मते मिळाली होती. या मतांची टक्केवारी 57.11 टक्के होती. तर काँग्रेसचे उमेदवार आसिफ अहमद हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 48309 मतं मिळाली होते. त्यांना मिळालेली ही मतं 36.9 टक्के होती. या जेगागेवर तिसऱ्या क्रमांकावर नोटा या पर्यायाला मतं मिळाली होती. येथे नोटाला 3531 मतं मिळाली होती. 


2014 सालच्या निवडणुकीत नेमकं काय झालं होतं?


2014 सालच्या निवडणुकीतही शेलार यांनीच बाजी मारली होती. त्यांना 2014 साली एकूण 74779 मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 50.93 टक्के होते. तर दुसऱ्या क्रमांकावर येथे काँग्रेसचे बाबा सिद्दीकी होते. त्यांना एकूण 47868 टक्के मतं मिळाली होती. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ही 32.61 टक्के होती.


हेही वाचा :


Kalina Vidhan Sabha constituency: कलिना विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर, संजय पोतनीस की अमरजित सिंह, कोण बाजी मारणार?


Kurla Vidhan Sabha constituency: विधानसभेची खडाजंगी: कुर्ला विधानसभा मतदारसंघात मंगेश कुडाळकर हॅटट्रिक साधणार की मविआ ऐनवेळी धक्का देणार?


Chembur Vidhan Sabha constituency: विधानसभेची खडाजंगी: चेंबूरमध्ये ठाकरेंच्या बलाढ्य किल्ल्यातून कोणाला उमेदवारी, महायुतीचा उमेदवार कोण?