एक्स्प्लोर

राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबतची भूमिका स्पष्ट करावी, बाळासाहेब थोरात आक्रमक, विखे-थोरात वाद पुन्हा चव्हाट्यावर

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीच थोरातांनी केली आहे. विखे कुटुंबाला काँग्रेसनं खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षानं पूर्ण केल्या असंही थोरात म्हणाले.

अहमदनगर : सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत बाळासाहेब थोरात आक्रमक झाले आहेत. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीच थोरातांनी केली आहे. विखे कुटुंबाला काँग्रेसनं खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षानं पूर्ण केल्या असंही थोरात म्हणाले. थोरात म्हणाले की, सुजय विखेंचा निर्णय वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिलं, हा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिलं आहे, असे थोरात म्हणाले. विखेंच्या सर्वच अपेक्षा पक्षांनं पूर्ण केल्या असताना हा निर्णय त्यांना फायदेशीर ठरणार नाही याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले. VIDEO | राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा? | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा मी कमिटीचा सदस्य नाही. त्यामुळे मी जागेचा आग्रह करणे योग्य नाही. राष्ट्रवादीने जागा द्यावी की नाही हे त्यांचा निर्णय आहे, असेही ते म्हणाले. राज्यात महत्वाची जबाबदारी असणारे नेतृत्व विखे पाटलांकडे आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, याचीही आठवण त्यांनी करुन दिली. आता ते विरोधी पक्ष नेतेपदी राहणार असतील तर त्यांनी बैठक घेणं गरजेचं आहे. स्क्रीनिंग कमिटीत असताना आता आपण नेतृत्व दाखविण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. जर ते विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसतील तर जनतेच्या समोर येऊन भूमिका मांडण गरजेचं आहे, असेही थोरात यावेळी म्हणाले. त्यांच्याबाबत अविश्वासाचं वातावरण असल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली. VIDEO | सुजय विखे 'मातोश्री'वर | मुंबई | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
Embed widget