Ashok Chavan, नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघाचा आढावा घेतला. "पंधरा दिवसापासून झोप नव्हती दोन महिन्यापासून गाठीभेटी घेत होतो जागरण होत असल्यामुळे मतदान झाल्यानंतर निवांत झोप घेतली. कार्यकर्त्यांनी सांगितले की दुपारी दोन नंतरच भेटायला या शेवटी शरीराकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. आज प्रत्येक भोकर मधल्या कार्यकर्त्याची गाठीभेटी घेतली. त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी काम केले ते त्यांच्याकडून ते सगळं ऐकून घेतले. मतदारसंघात मतदान सुद्धा चांगले झालेले आहे. 75 टक्के रिझल्ट मिळतोय. चांगला त्याचा आनंद आहे. उमेदवारापेक्षा कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेले आहे", असे अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
एक्झिट पोल बाबतीत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे, पण माझी स्वतःची भूमिका ही आहे. एक्झिट पोल हे वास्तव नाहीये. मी रियालिटीवर बोलणारा माणूस आहे. आता एक दिवस बाकी आहे. 23 तारखेला बघूयात काय होती ते पण मला अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने महायुतीच्या घटक पक्षांनी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार निश्चितच बनेल असा विश्वास देखील अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार येणार असा दावा केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्या बारीक चिमटा काढत त्यांना तर मुख्यमंत्री करायचे पण हे त्यांचे स्वप्नच राहणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
भोकर विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण हे 1,40,559 मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा पराभव केला होता. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अमिता अशोकराव चव्हाण 1,00,781 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपा पक्षाचे डॉ. माधवराव भुजंगराव किनहालकर यांचा परभाव केला होता.
यावेळी भोकर मतदारसंघात नेमकं काय होणार?
2019 च्या निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं आता भोकर विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan)निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय.
इतर महत्त्वाच्या बातम्या