एक्स्प्लोर
Advertisement
अॅक्टरलाही वाटलं असेल, की मोदी आपल्यापेक्षा चांगली अॅक्टिंग करतात : ओवेसी
धुळे मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहेमदुल्ला यांची मालेगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मुलाखतीवरुन ओवेसींनी टीका केली. मुशर्वत चौकात झालेल्या या सभेला मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
मुंबई : "टीव्हीवरील अँकर त्यांच्यासारखी अॅक्टिंग करु शकत नव्हते म्हणून मोदी खऱ्या अॅक्टरला घेऊन आले. पण अभिनेताही गोंधळला असेल की मला अभिनयासाठी पैसे मिळतात आणि मोदी तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात," असा टोला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी लगावला.
धुळे मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहेमदुल्ला यांची मालेगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मुलाखतीवरुन ओवेसींनी टीका केली. मुशर्वत चौकात झालेल्या या सभेला मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना ओवेसी म्हणाले की, "टीव्हीवर मुलाखत झाली मित्रों की, अँकर त्यांच्यासारखी अॅक्टिंग करु शकत नव्हते. मग मोदी खऱ्या अॅक्टरला घेऊन आले. घरात बसून मुलाखत दिली. मागे मोर ओरडत होते. मोदी म्हणतात मी झोपत नाही. मला झोप येत नाही. मी साडेचार तास झोपतो. पण झोप येत नाही कारण घरात कोणीही नाही. तुम्ही एकटे राहता, तर झोप कशी येईल? मोदीजी झोपून जा आता. आता तुमच्या झोपण्याचे दिवस आले आहेत."
"असं वाटत होतं की मोदी सर्वात मोठे अभिनेते आहे. त्यामुळे अॅक्टरही गोंधळला की, अरे मला तर अॅक्टिंगसाठी पैसे मिळतात आणि हे तर माझ्यापेक्षा चांगली अॅक्टिंग करतात. ते बोलतात की चार तास झोपतो, मग आमच्यावर उपकार करता का?" अशी टीकाही ओवेसींनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement