Chandrakant Patil On Gokul : गोकुळ निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, क्रॉस व्होटिंग....
Chandrakant Patil On Gokul : सर्वसाधारण गटासह पाच गटांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात ही चर्चा आहे त्यामुळे अंतिम निकालासाठी दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

कोल्हापूर : आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, या निकालाची धाकधूक आणि उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काल अत्यंत चुरशीने 99.96 टक्के मतदान झाल्यानंतर गोकुळचा गुलाल महायुती उधळणार की सतेज पाटील महायुतीचा परभाव करून इतिहास घडवणार याकडे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणामध्ये गोकुळच्या निवडणुकीसाठी क्रॉस व्होटिंगची झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी गनिमी काव्याने महायुतीला घाम फोडला तर नाही ना अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सर्वसाधारण गटासह पाच गटांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात ही चर्चा आहे त्यामुळे अंतिम निकालासाठी दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तर या सर्व घडामोडींच्या दरम्यान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.(Chandrakant Patil On Gokul Election 2026 Results)
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, गोकुळचा निकाल आम्हाला 25 पैकी 25 अपेक्षित आहेत. गोकुळच्या मतमोजणीचा कल आमच्याबाजूने पॉझिटिव्ह आहे. कपबाशी जोरात चालू आहे. क्रॉस व्होटिंगचं काही होणार नाही. अंतर फार मोठं आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.(Chandrakant Patil)
तर गोकुळ मतमोजणीमध्ये आतापर्यंत सर्वसाधारण गटातील 1650 मतदानाची मोजणी पूर्ण झाली आहे. महायुतीचे सर्वसाधारण गटातील 20 पैकी 17 उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर आहेत. तर सतेज पाटील यांचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत. आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी दिसून येत आहे. दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका महायुतीला बसल्याचं दिसून येत आहे, एकीकडे महायुतीने आपले मतदार क्रॉस व्होटिंग करू नयेत किंवा त्यांचं मत बदलू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते, सहल, शपथा, भंडारा उचलून शब्द देणं आणि बरचं काही महायुतीकडून करण्यात आलं होतं. तरीही क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू आहे.
Chandrakant Patil : पुणे शिक्षकवकती चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
शिवसेना शिक्षकमध्ये सुद्धा आम्ही एकनाथ शिंदेना विनंती करतोय की हे सोयीचे होणार नाही. ते मनाने इतके चांगले आहेत की. काही चुका झाल्या असतील तर माफ करतील. आणि सानपचा पाठिंबा काढून कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देतील. पदवीधरसाठी तर ते पूर्णपणे पाठीशी आहेत, असंही पाटील म्हणालेत.




















