एक्स्प्लोर

लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उद्धव ठाकरेंविषयी अमित शाह म्हणतात...

महाराष्ट्रातील सर्व लोकसभेच्या जागा बहुमताने जिंकून देतील. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते युतीला मोठा विजय मिळवून देतील आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवतील, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांना अफजलखानाची उपमा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शाह यांच्या लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरला गेले होते. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारत शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर काँग्रेस आणि सोशल मीडियावर टीका आणि या भेटीची खिल्ली उडवली जात आहे. VIDEO | उद्धव ठाकरेंसह अनेक नेते गुजरातमध्ये दाखल, सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी | अहमदाबाद | एबीपी माझा दुसरीकडे या भेटीनंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचे ट्विटरवरुन  आभार मानले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो. भाजपा-शिवसेना युती ही राष्ट्रवाद मानणाऱ्या दोन पक्षाची युती आहे, असे शाह यांनी म्हटले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मिळून महाराष्ट्रातील सर्व लोकसभेच्या जागा बहुमताने जिंकून देतील. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते युतीला मोठा विजय मिळवून देतील आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवतील, असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या गांधीनगरमध्ये येण्यानं अनेकांच्या पोटात दुखतंय. भाजप आणि आमच्यात मतभेद होते, पण आता आमची मनं जुळलीत असं प्रतिपादन उद्धव ठाकरेंनी शाह यांच्या रॅलीत बोलताना केलं होतं. यावेळी विरोधकांचा नेता कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. अफझलखानाच्या भेटीला शिवसेनेच्या उंदरांची फलटण, काँग्रेसची टीका अमित शाहांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जाणं म्हणजे अफझलखानाच्या भेटीला शिवसेनेच्या उंदरांची फलटण जाणं आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंचं कान पकडून त्यांनी त्यांना खडसावले असते आणि उठाबशा करायला लावल्या असत्या, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. शिवसेनेचे नेते जरी भाजपच्या मांडीवर जाऊन बसले असले तरी बहुतांश शिवसैनिकांना मात्र हे मान्य नाही, यावेळी शिवसैनिक देखील भाजप-शिवसेनेच्या विरोधात मतदान करेल असेही सावंत यावेळी म्हणाले. ही महायुती नसून देशासमोर महाआपत्ती आहे, ही आपत्ती निवारण करण्यासाठी देश सज्ज झाला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस विरोधात लढणाऱ्या दोन्ही पक्षांकडे स्वाभिमान नाहीये, असेही ते म्हणाले. सचिन सावंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. त्यावेळी त्यांनी विनायक राउत आणि निलेश राणे हे दोन्हीही उमेदवार मोदींच्या कडेवर बसलेले आहेत, अशी टीका केली. जोरदार शक्तीप्रर्शन करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (30 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमित शाहांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एनडीएतील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget