Amit Shah, सांगली : "500 वर्षे वादात असलेला राम मंदिराचा मुद्दा मोदीजींनी सोडवला. 5 वर्षात केस जिंकून मंदिर देखील बांधले. शरद पवार आणि कंपनी राम मंदिरात दर्शनाला गेले नाहीत. कारण त्यांना वोट बँकेची भीती वाटते. भाजपला कोणत्या वोट बँकेची भीती वाटत नाही", असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते सांगलीत महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.
राहुल बाबा हातात लाल संविधान वाटत आहेत
अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरे आपल्याला लाज वाटली पाहिजे, आपण औरंगाबादच्या नामांत्तरला विरोध करणाऱ्या सोबत आहात.
वक्फ बोर्डाच्या कायद्यात बदल करण्याला आपलं विरोध करत आहेत. शरद पवार आपण ऐका तुम्ही कितीही ताकद लावा वक्फ बोर्डाच्या कायद्यात आम्ही बदल करणार आहोत. राहुल बाबा हातात लाल संविधान वाटत आहेत. पण केवळ एक पान सोडलं तर आतमध्ये काहीही लिहिलेले नाही. राहुल गांधी यांनी संविधानाचा अवमान केला.
राहुल बाबा काश्मीरमध्ये दुचाकी चालवतात, बहिणीबरोबर बर्फमध्ये खेळतात
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणत होते की काश्मीर जायला भीती वाटते. आता शिंदेंजी नातू नातवाला घेऊन काश्मीर फिरून या. राहुल बाबा काश्मीरमध्ये दुचाकी चालवतात, बहिणीबरोबर बर्फमध्ये खेळतात. हे केवळ काश्मीरमधील दहशत कमी केल्याने झालं आहे. माझी सासुरवाडी कोल्हापूर आहे. मला माहिती आहे विमानतळ सुरू करण्याआधी कोल्हापूर येणं किती कठिण होतं. ही महाविकास आघाडी नाही तर महाविनाश आघाडी आहे. शरद पवार आपण 10 वर्षे मंत्री होते. महाराष्ट्रासाठी आपण काय दिलं याचं उत्तर द्या. पवारांनी 10 वर्षात 1 लाख 51 हजार निधी आणला, मोदींनी 10 वर्षात 10 लाख हजारहून आधी निधी दिला.
काँग्रेसच्या काळात सतत पाकिस्तानकडून हल्ले व्हायचे
शरद पवार म्हणतात की महाराष्ट्रात गुंतवणूक आली नाही. इतर राज्यात गुंतवणूक गेली म्हणतात. पण शरद पवार आपली स्मरण शक्ती कमी आहे. फडणवीस आणि महायुतीने सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. जम्मू काश्मीर आपलं आहे की नाही? कलम 370 हटवण्याचं काम आम्ही केलं. बिल घेऊन संसदेत उभा राहिलो त्यावेळी सर्व विरोधक काव काव करत होते. पण 6 वर्षे झालं काहीही झालं नाही. राहुल बाबा तुमच्या 4 पिढ्या 370 पुन्हा आणू शकत नाही. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. काँग्रेसच्या काळात सतत पाकिस्तानकडून हल्ले व्हायचे. मोदी आल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेकी समाप्त केलं. एकीकडे विकासाची गोष्टी होत आहे आणि दुसरीकडे तीन कुटुंबाची चर्चा होत आहे. देशात बोलयच धाडस नाही, राहुल बाबा परदेशात जाऊन आरक्षण हटवण्याची भाषा करतो, असंही अमित शाह म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या