ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही. टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळू शकते. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही पाकिस्तानात न जाण्याचे कारण दिले आहे. बीसीसीआयने सुरक्षेचे कारण सांगितले आहे.
इंडियन एक्सप्रेसमधील एका बातमीनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. अलीकडेच बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली. यामध्ये बीसीसीआयने सुरक्षेचे कारण सांगितले आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळू शकतो. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर नुकतेच पाकिस्तानला गेले होते. यानंतर टीम इंडियाचीही बरीच चर्चा झाली. पण आता पाकिस्तानला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानने भारताला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बीसीसीआयने सुरक्षेचे कारण देत सर्व प्रस्ताव फेटाळले. टीम इंडिया पाकिस्तानमध्ये न गेल्याने पीसीबीला मोठा फटका बसणार आहे. यामुळे त्याचे आर्थिक नुकसानही होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानने आपल्या स्टेडियममध्ये बरेच काम केले आहे. त्यासाठी त्यांना नव्याने करावी लागली. यासाठी आयसीसीने निधीही जारी केला होता.
टीम इंडिया दुबईत खेळू शकते सामने
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळू शकते. यापूर्वी श्रीलंकेबाबतही चर्चा झाली होती. मात्र बीसीसीआयने दुबईचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाऊ शकते.
हे ही वाचा -