Akkalkuwa Vidhan Sabha Constituency: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे (Akkalkuwa Vidhan Sabha Constituency Election) निकाल स्पष्ट झालेत. हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपेकीपैकी तिसरा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. त्यासाठी राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. (Nandurbar District Vidhan Sabha Election) आहेत. या मतदारसंघातून के.सी. पाडवी (K C Padwi), आमश्या पाडवी (Amshya Padwi), हिना गावित (Hina Gavit), पदमाकर वळवी (Padmakar Walvi) यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळली आहे. यंदा या निवडणूकीची अनोखी झलक पाहायला मिळाली आहे.


अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत


के.सी पाडवी - काँग्रेस.
आमश्या पाडवी - शिवसेना (शिंदे गट) विजयी
हिना गावित - भाजपा - बंडखोर.
पदमाकर वळवी - भारतीय आदिवासी पार्टी.


या विधानसभा मतदार संघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यानी बंडखोरी केल्याने अडचणीत वाढ झाली होती. ज्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत गावित यांना साथ दिली होती, त्यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळाली.


2019 च्या निवडणुकीत काय झाले?


2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने के सी पाडवी यांना सलग तिसऱ्यांदा ही जागा लढवण्याची संधी दिली होती. पाडवी हे अनुभवी नेते आहेत आणि गेल्या तीन दशकांपासून राजकारणात त्यांची विश्वासार्हता टिकवून आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेने आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली होती. निकराच्या लढतीत अखेर काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेसचे केसी पाडवी यांनी शिवसेनेच्या आमश्या पाडवी यांचा 2096 मतांनी पराभव केला. केसी पाडवी यांना 82,770 तर आमश्या पाडवी यांना 80,674 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते, ज्यांना 21,664 मते मिळाली होती.


मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?


महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections/amp  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.


हेही वाचा>>


Nandurbar Assembly Election 2024: नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? चारही मतदारसंघात काट्याची लढाई