Ajit Pawar on R. R. Patil : "2004 सालं होतं, मला तरुणांना संधी देण्याची आवड होती. त्यावेळी आपला नेता कोण करायचा ते ठरलं. त्यामध्ये पद्मसिंह पाटील , विजयदादा , छगन भुजबळ , जयंत पाटील आणि आर आर पाटील होते. ते पाच जण उभे राहिले. या चार लोकांना इतकी कमी मतं पडली की ते म्हणाले आर. आरला जाहीर करुन टाका. मी सर्व मतं आर आरला मिळवून दिली. मला स्वत:ला नेता होता आलं असतं. मी म्हणालो नाही गरीब कुटुंबातील आहे. ग्रामीण भागातील आहे. शिक्षण फार कष्टाने घेतलेलं आहे. मग त्यावेळेस तो उपमुख्यमंत्री झाला. खरं तर मुख्यमंत्री झाला असता साहेबांनी का सोडलं माहिती नाही. साहेबांनी चार मंत्रिपद जास्त घेतले आणि मुख्यमंत्रिपद सोडून दिलं", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.
मी इस्लामपूरला त्याला तंबाखू खाऊ नको, असं सांगितलं होतं
अजित पवार म्हणाले, मी आर आरला राजीनामा द्यायला सांगितला, तो न सांगता अंजनीला निघून आला. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे शहरो मे छोटे-छोटे हातसे होते रहते है असे म्हणाले आणि आर आर पाटील यांना कोणीतरी राजीनामा द्यायला सांगितला. मला त्याने सांगितलंही नाही. पण नंतर मी त्याला पक्षाचा प्रांतअध्यक्ष केलं. नंतरच्या काळात बिचाऱ्याला आजार झाला. आम्हाला त्याने खोटं सांगितलं गाल सुजलाय, गालफुगी झाली. परंतु डॉक्टरांनी त्यांना सांगितलं काय झालंय ते. मी इस्लामपूरला त्याला तंबाखू खाऊ नको, असं सांगितलं होतं. मी त्याच्यावर टीका केली होती. कशाला तंबाखू खात असतो म्हणालो. पण मी नसलो की, गुपचूप तंबाखू खायचा.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झालं. परंतु माझ्या सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस याही त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्यात आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता.
भाजपला बिनशर्त पाठिंबा कसं काय दिला जातो?
2014 मध्ये विधानसभेचा निकाल लागतो न लागतो तोपर्यंतच साहेबांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. भाजपला बिनशर्त पाठिंबा कसं काय दिला जातो? विचारधारा सोडून कशी मदत केली असं विचारल्यावर साहेबांनी सांगितलं सरकार बदललं आहे मदत केली पाहिजे. 1999 मध्ये देखील असंच झालं होतं. सोनिया गांधी यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीची स्थापना झाली. लगेच विधानसभा निवडणुका होताच काँग्रेसला पाठिंबा दिला. तेव्हा देखील साहेब म्हणाले सरकारमध्ये गेल्याशिवाय काम होत नाहीत. मग मी गेलो तर काय झालं. माझं काय चुकलं? असा सवालही अजित पवार यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या