Narayan Rane on Rajan Teli : दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यासमोर आमच्या एका मंत्र्याची पिशवी पकडणारे टक्केवारीवर उदरनिर्वाह करणारे राजन तेली (Rajan Tel) उभे आहेत, असं म्हणत खासदार नारायण राणे ( Narayan Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली. पाऊस पडला की बेडकं ओरडतात, तसं निवडणूक आली की उड्या मारणारा हा बेडूक आहे, असा टोलाही राणेंनी राजन तेलींना लगावला. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याने आणि आदित्य ठाकरेंनी औषधांचे 15 टक्के खाल्ल्याचा आरोप राणेंनी केला आहे.
शोषण करणाऱ्यांना मतदान करु नका, राणेंचं आवाहन
तुम्हाला उन्हात तापवण्याचं कारण आपला मतदार तापलेला असावा केवळ उन्हाने नाही विचारांनी असेही राणे म्हणाले. ही निवडणूक कसली आहे विधानसभा की जिल्हा परिषद समोर कसले विरोधक आहेत असेही राणे म्हणाले. दिपक केसरकर हे दिग्गज नेते आहेत मंत्री आहेत असं म्हणत राणेंनी त्यांचे कौतुकही केले. दरम्यान, शोषण करणाऱ्यांना मतदान करु नका. केसरकरांनी केलेल्या कामाची पोचपावती मागायला मी आलोय, मतांची भीक मागायला आलो नाही असेही राणे म्हणाले.
दिपक केसरकर यांना परत मंत्री होण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा
जो कोणी विकासाच्या आड येईल त्याच्यावर पोलिसांनी केस टाकावी त्याला सोडू नये असेही नारायण राणे म्हणाले. योग्य माणसाला मतदान करा पुढच्या पाच वर्षात तुमच्या भागाचा काया पालट होईल. जे आमच्या विरोधात उमेदवार आहेत त्यांचे विधायक कार्य सांगा असी टीकाही राणेंनी राजन तेली यांच्यावर केली. आमचे तीन उमेदवार निवडणूक लढवतात तिघाचे काम चांगले आहे असेह राणे म्हणाले. ब्राऊन शुगर सप्लाय करणारे कोण आहेत, त्यांची नावं पोलीसांनी निवडणुकीनंतर जाहीर करावी, असे म्हणत बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्यावर देखील राणेंनी नाव न घेता टीका केली. दिपक केसरकर यांना परत मंत्री होण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा असेही राणे म्हणाले.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, अशातच कोकणात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच पक्ष सोडण्यामागची कारणही सांगितली आहे.
महत्वाच्या बातम्या: