एक्स्प्लोर

'तो' सल्ला पार्थला, साहेब म्हणाले तुला बारामती लढवावी लागेल-अजित पवार

हे राजकारण आम्ही ६० वर्ष पाहिलंय. म्हणून मी पार्थला सल्ला दिला की तू आपलं शेती-व्यवसाय बघ, या शब्दात अजित पवारांनी त्यांच्या राजकीय संन्यासाच्या अंदाजांना धुडकावून लावलं. काल त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, अजित पवारांनी मुलाशी राजकारण सोडून शेती-उद्योग करण्यावर चर्चा केली, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. त्यावर त्यांनी हे स्पष्टिकरण दिलं.

मुंबई: आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अजित पवार राजकारणातून संन्यास घेतील अशी चर्चा सुरू झाली. खुद्द शरद पवार यांनीच कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आपल्या मुलाशी झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली होती. ज्यात अजित पवार हे राजकारण सोडून शेती-उद्योग करण्याबाबत पार्थही बोलले होते. अजित पवार अन्य कुठल्याही पक्षात जाणं शक्य नसल्यानं शिवाय राष्ट्रवादीअंतर्गत रोहित पवारांचा उदय होत असल्यानं, अजित पवार राजकारण सोडतील का? हाच प्रश्न राजकीय जाणकारांच्या मनातही होता. मात्र, अजित पवारांनी या शक्यता फेटाळून लावल्या. आज यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर 'एबीपी माझा'शी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, मी शस्त्र खाली टाकलेलं नाही. मात्र, आम्ही सगळे (पवार कुटुंबिय या अर्थानं) गेली ६० वर्ष हे राजकारण पाहतोय. म्हणून मुलाला सल्ला दिला की तू आपला धंदापाणी पाहा. बारामतीतून निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर अजित पवार आधी म्हणाले की पवार साहेब देतील तो निर्णय मान्य असेल. मात्र, नंतर साहेब म्हणाले की तुला बारामती लढवावी लागेल. यानंतर त्यांनी शेजारीच असलेल्या पक्षाध्यक्ष जयंत पाटलांकडे पुढचे प्रश्न टोलावले. याच प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार बारामतीत प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी नाही लढवायचं म्हटलं तरी लोक त्यांना घराबाहेर काढून निवडणुकीला उभं करतील. शिखर बँक घोटाळाप्रकरणीही पत्रकारांनी विचारलं असता, "चौकश्या झाल्या पाहिजेत. जे असेल ते बाहेर यायला पाहिजे. आता सारखं तेच विचारणार असाल तर आख्ख्या फॅमिलीचं अफिडेव्हिट देऊ का"? असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

Embed widget