एक्स्प्लोर

आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, मनसेकडून विरोधात उमेदवारी न देण्याबाबत उद्धव ठाकरे म्हणतात

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमची परंपरा जनतेची सेवा करण्याची आहे. ती पुढच्या पिढीत देखील कायम आहे. आम्ही निवडणूक न लढवता सेवा केली मात्र ही आजची नवी पिढी आहे. आदित्यासोबत तुमचा आशीर्वाद कायम राहिलं, असेही ते म्हणाले.

मुंबई :  शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. दरम्यान दुपारी 12.15 च्या सुमारास आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. दरम्यान आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेचे आभार मानले. तसेच मनसेने आदित्य यांच्या विरोधात उमेदवार दिला नसल्याबाबत विचारले असता देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांचे आभार मानले.  जे जे या निवडणुकीसाठी आदित्यला आशीर्वाद देताहेत त्यांना मी धन्यवाद देतो, मी या सर्वांप्रती ऋणी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचे विशेष आभार मानले. उद्धव ठाकरे म्हणाले की, वरळीच्या जनतेच्या आदित्यचा स्वीकार केला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार.  माझ्यापर्यंत निवडणूक न लढविण्याची आमच्या कुटुंबाची परंपरा होती. मात्र आता नवीन पिढी आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे विचार नवे आहेत. तरुणांच्या विचारानेच देश आणि राज्य पुढे जावे ही जनतेची इच्छा आहे, असे ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, आमची परंपरा जनतेची सेवा करण्याची आहे. ती पुढच्या पिढीत देखील कायम आहे. आम्ही निवडणूक न लढवता सेवा केली मात्र ही आजची नवी पिढी आहे. आदित्यासोबत तुमचा आशीर्वाद कायम राहिलं, हा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मी सर्व शिवसैनिक आणि जनतेचा आभारी आहे. महाराष्ट्रासोबत वरळीचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. दरम्यान रॅलीदरम्यान बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."
Ajay Baraskar: मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
BRICS Summit : ग्लोबल गव्हर्नन्स रिफॉर्म्ससाठी ब्रिक्स देशांनी 10 प्रस्ताव तयार करावेत, ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं : नरेंद्र मोदी
ब्रिक्सनं नव्या आणि महत्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावं, ब्रिक्सच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा दाखला देत नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Popular Actress on Suryakumar Yadav chats: 'माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या सगळ्या चॅट्सचे पुरावे..' क्रिकेटरमुळे इन्स्टा अकाउंट बंद झाल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली..
'माझ्याकडे सूर्यकुमार यादवच्या सगळ्या चॅट्सचे पुरावे..' क्रिकेटरमुळे इन्स्टा अकाउंट बंद झाल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली..
Embed widget