एक्स्प्लोर

काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास, उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसप्रवेश

लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचं सांगत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अखेर काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन उर्मिलाने पक्षप्रवेश केला. उर्मिला काँग्रेसतर्फे मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचं उर्मिलाने यावेळी सांगितलं. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे आपण पक्षप्रवेश केल्याचंही तिने सांगितलं. उत्तर मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेस शेट्टींविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावं चर्चेत होती. 1977 साली वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी उर्मिलाने 'कर्म' चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरु केली. 1980 मध्ये श्रीराम लागूंसोबत झाकोळ चित्रपटातही ती झळकली. वयाच्या नवव्या वर्षी (1983) तिने शेखर कपूर यांच्या 'मासूम'मध्ये केलेली भूमिका विशेष गाजली. 'लकडी की काठी...' हे तिचं गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. उर्मिलाने तिच्या कारकीर्दीत रंगिला, सत्या, दौड, जुदाई, कौन, मस्त, खुबसूरत, जंगल, भूत, पिंजर अशा असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. राम गोपाल वर्मासोबत तिचे बरेच चित्रपट गाजले. ईएमआय (2008) या चित्रपटानंतर ती हिंदीत मुख्य भूमिकेत झळकली नाही. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास, उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसप्रवेश 'हृदयनाथ' (2008) हा तिचा आयटम साँग असलेला मराठी चित्रपट. 'आजोबा' (2014) या मराठी चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा करताना ती मोठ्या पडद्यावर अखेरची दिसली होती. दरम्यानच्या काळात झलक दिखला जा 2 (2007), मराठी पाऊल पडते पुढे (2011) डान्स महाराष्ट्र डान्स (2012) यासारख्या डान्स रिअॅलिटी शोजचं परीक्षण उर्मिलाने केलं. नुकतंच 'ब्लॅकमेल' चित्रपटात उर्मिला 'बेवफा ब्यूटी' या आयटम नंबरमध्ये दिसली. तब्बल दहा वर्षांनी आयटम नंबरपुरतं का असेना बॉलिवूडमध्ये उर्मिलाचं पुनरागमन झालं. 'चायना गेट' चित्रपटातील 'छम्मा छम्मा'नंतर लज्जा, कंपनी सारख्या चित्रपटातही तिने आयटम नंबर केले होते. 2007 मध्ये 'राम गोपाल वर्मा की आग'मध्ये मेहबूबा या गाण्यातल्या तिच्या दिलखेच अदांनी प्रेक्षक घायाळ झाले. 3 मार्च 2016 रोजी उर्मिलाने वयाने दहा वर्षांनी तरुण असलेल्या बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीरसोबत विवाहगाठ बांधली. वयाच्या 45 व्या वर्षी उर्मिलाने राजकीय कारकीर्द सुरु केली. राहुल गांधींसोबत संजय निरुपम, मिलिंद देवरा यासारख्या काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत तिने पक्षप्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget