एक्स्प्लोर

अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांचा भाजपप्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करता येण्याचा आनंद व्यक्त करत जयाप्रदा यांनी भाजपप्रवेश केला.

नवी दिल्ली : प्रख्यात अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आनंद जयाप्रदा यांनी व्यक्त केला. 'ज्या पक्षाचं नेतृत्व देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष घालतं, अशा राष्ट्रीय पक्षात मी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करता येणार आहे, याचा आनंद आहे' असं जयाप्रदा म्हणाल्या. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत जयाप्रदांनी भाजपप्रवेश केला. 1994 साली तेलुगू देसम पक्षातून जयाप्रदा यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र चंद्राबाबू नायडूंसोबतच्या मतभेदानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला. जयाप्रदा यांनी 2004 आणि 2009 मध्ये सपातर्फे खासदारपद भूषवलं आहे. VIDEO | जयाप्रदा यांचा भाजप प्रवेश, आझम खान यांच्याविरोधात रिंगणात? | नवी दिल्ली | एबीपी माझा मुलायमसिंह यांच्यासोबत झालेल्या वादानंतर जयाप्रदा आणि त्यांचे सहकारी अमर सिंह यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दोघांनी राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला. 2014 मध्येही बिजनौरमधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, मात्र भाजपकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. अखेर जयाप्रदा यांनी सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांनी त्रास दिल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी जयाप्रदांनी केला होता. आझम खान यांनी 2009 मध्ये आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी अश्लील फोटोंचं वाटप केल्याचा दावाही त्यांनी केला होता. जयाप्रदांनी आझम खान यांचा उद्धटपणा जिरवण्याची शपथ 2009 मध्ये घेतली होती. त्यानंतर दोघांमधील कटुता सर्वांसमोर आली.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget