ABP Opinion Poll : पंजाबमध्ये (Punjab)  13 दिवसांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Election 2022) मतदान होणार आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेसची   (Congress) लढत ही  प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि अकाली दल- बीएसपीच्या युतीशी होणार आहे.    या निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्ष बहुमताजवळ जाण्याची शक्यता आहे.  कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्या पंजाब लोक कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाशी युती केली आहे. एबीपी माझाच्या सी वोटर सर्व्हेमध्ये वरील अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्व्हेनुसार या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसला 117 जागांपैकी 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाला (AAP)  55 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अकली दल महायुतीला 20 आणि 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला (BJP)तीन ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अपक्षांना  0 ते 2 जागा मिळण्याची शक्यका आहे. कोणत्याही पक्षाला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 59 जागांची गरज आहे. 

पंजाबमध्ये कुणाला किती जागा ?     

 पक्ष   एकूण जागा 
आप     55 ते 63
काँग्रेस     24  ते 30
अकाली दल   20 ते 26
भाजप     3 ते 11      
इतर        0 ते 2 

मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर एबीपी  न्यूज़-सी वोटर (ABP C Voter Survey) नुसार, आम  आदमी पार्टीला 40 टक्के, कॉंग्रेसला 30 टक्के, अकाली दल युतला 20 टक्के,  भाजप युतीला 8 टक्के   आणि अपक्षांना 2 टक्के मतं मिळणयाची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला पसंती?

पंजाब       फेब्रुवारी जानेवारी      
  भगवंत मान (आप)      23.3      35.7
चरणजित सिंह चन्नी (काँग्रेस) 28.8 25.9
सुखबीर सिंग बादल (अकाली दल) 15.2 18.7
कॅ. अमरिंदर सिंग (पीएलसी)  5.8 8.8
नवज्योतसिंग सिद्धू (काँग्रेस)   5.7 3.9
अरविंद केजरीवाल (आप)   17.1 3.6

पंजाबमध्ये कॉंग्रेल चरणजीत सिंह (Charanjit Singh Channi)  यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवत आहे. तर आम आदमी पक्षाकडून भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जात आहे.  अकाली दलाकडून सुखबीर सिंग बादल हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपादासाठीच्या नावाची घोषणा केली आहे. तर कॉंग्रेसने नवज्योतसिंग सिद्धू यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा केली आहे. गेल्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर कॉंग्रसला 77, अकाली दलाला 15, आम आदमी पक्षाला 20, भाजपला 20 आणि इतरांना दोन जागा मिळाल्या होत्या.

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?

पंजाब      

मतांची टक्केवारी

काँग्रेस 30
आप   39.8
अकाली दल   20.2
भाजप+     8.0
इतर  2.0

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. गेले अनेक महिने या प्रचाराची जोरदार तयारी सुरू होती.. युत्या आघाड्यांपासून ते पक्षबदलांपर्यंतच्या सगळ्या घडामोडींनंतर आता प्रत्यक्ष निवडणूकांचे  वेध लागले आहे. जातीय समीकरणं, कोरोनाचा अजूनही न सुटणारा विळखा, महागाईचे चटके, बेरोजगारीची धगधग अशा सगळ्या मुद्द्यांवर निवडणूकीच्या प्रचारात कीस पडतोय पण यातले कोणते मुद्दे जनतेच्या मनात खरोखर उतरतायत . या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी पाच राज्यांचा ओपिनयन पोल घेण्यात  आला आहे.  सी वोटर ने एबीपी नेटवर्कसाठी पाचही राज्यांतील 690 मतदारसंघातील 1 लाख 36 हजार मतदारांशी बोलून हा ओपिनियन पोल तयार केलाय. 11 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत हा फायनल ओपिनिअन पोल कंडक्ट करण्यात आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

उत्तराखंडमध्ये 'काँटे की टक्कर', काँग्रेस-भाजप की आप, यंदा आकडे कुणाच्या बाजूने?

ABP Opinion Poll: मणिपुरमध्ये यंदा कोणाची सत्ता? काँग्रेस की भाजप? जनतेचा कौल कुणाकडे?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha