ABP C Voter Opinion Poll : मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रचार आणि आरोपप्रत्यारोप रंगले आहेत. उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. पण, उत्तराखंडमध्ये कुणाची सत्ता येणार? हे दहा मार्च रोजीच समजेल. पण त्याआधी मतदारांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होत आहे.
मतदारांना आपल्या आकर्षीत करण्यासाठी दावे, वचनांचा पाऊस पडत आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. त्यामुळे राज्यात कुणाची सत्ता येणार, याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. भाजप पुन्हा उत्तराखंडमध्ये सत्ता स्थापन करणार का? की उत्तराखंडमध्ये काँग्रेस अथवा आप सत्तेत येणार? उत्तराखंडची जनता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजने सी वोटरच्या साह्याने सर्व्हे केला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये कुणाची सत्ता येईल? असा प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आला.
कोणत्या पक्षाला किती टक्के मते?
उत्तराखंडमध्ये 70 विधानसभा जागा आहेत. सी वोटरने सर्व्हेत काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. भाजपला 43 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला 41 टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. आप पक्षाला 13 टक्के इतर इतरांना तीन टक्के मते मिळतील.
कुणाला मिळणार किती जागा?
सी-वोटरच्या सर्व्हेनुसार, भाजपला उत्तराखंडमध्ये 31-37 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 30-36 जागा मिळतील. तर आप पक्षाला 2-4 जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतरांच्या खात्यात 0-1 जागा मिळतील.
उत्तराखंडमध्ये कुणाला किती मते?
भाजप - 43%
काँग्रेस- 41%
आप- 13%
अन्य - 3%
उत्तराखंडमध्ये कुणाला किती जागा ?
भाजप- 31-37
काँग्रेस- 30-36
आप- 2-4
अन्य - 0-1
डिसेंबर | जानेवारी | फेब्रुवारी | |
भाजप | 33-39 | 2-4 | 2-4 |
काँग्रेस | 29-35 | 2-4 | 2-4 |
आप | 1-3 | 2-4 | 2-4 |
अन्य | 0-1 | 0-1 | 0-1 |
सूचना : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा प्रचार वेगाने सुरु आहे. थंडीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओपिनियन पोल सी-वोटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील 1 लाख 36 हजारपेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला आहे. 690 मतदारसंघामध्ये याबाबतचा अभ्यास केला. हा सर्व्हे 11 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकष सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.