ABP C Voter Survey: उत्तर प्रदेशच्या राजकीय लढाईला रोमांचक वळण लागलंय. कारण, आता यूपीच्या या राजकीय लढाईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) स्वतः मैदानात उतरले आहेत. अमित शहा यांनी यूपीमध्ये घरोघरी जाऊन प्रचाराची सुरुवात केलीय. त्यांनी लोकांना भाजपचं पत्रकही वाटलंय. त्यांनी काही नेत्यांसह घरोघरी जाऊन भाजपला विजयी करण्याचं जनतेला आवाहन केलंय. अमित शहा 23 जानेवारीपासून यूपीच्या दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन मतदारांना भाजपचे सरकार स्थापन करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशच्या राजकीय लढाईत अमित शहा पुन्हा उतरण्याचे कारण स्पष्ट आहे की, भाजपला यूपी निवडणुकीत अशी कोणतीही चूक करायची नाही, ज्यामुळं पक्षाला काही नुकसान होईल. त्यामुळेच अमित शहांसह इतर दिग्गज नेत्यांचे यूपी दौरे वाढले आहेत. अमित शहांच्या यूपी दौऱ्याचा भाजपला फायदा होईल का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एबीपी सी व्होटरची टीम लोकांपर्यंत पोहोचली.
एबीपी माझानं केलेल्या सर्वेक्षणातून अमित शाहाचा भाजपला फायदा होणार असल्याचे आकडे समोर आलेत. या प्रश्नाला एकूण 49 टक्के लोकांनी होकार दिलाय. तर, 37 टक्के लोकांनी नकार दर्शवलाय. याशिवाय, 14 टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडलाय.
आज मथुरेत असताना अमित शाहांनी विरोधी पक्षांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. म्हणाले की, भाजप सरकारनंतर बाहुबली पोलिसांच्या भितीनं आत्मसमर्पण करू लागले. जेव्हा त्यांच्यावर कारवाई होते, त्यावेळी अखिलेश यादव यांच्या पोटात दुखतं. आणखी कित्येक आजम खान आणि कित्येक मुख्तार पसरवले आहेत, कोणास ठाऊक. ज्यावेळी आजम खान अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्यावर इतके खटले होते की सीआरपीसीचे सर्व कलम कमी पडले.
हे देखील वाचा-
- Goa Election : भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण : उत्पल पर्रिकर
- पंजाबमध्ये काँग्रेसने चन्नी की सिद्धू कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी? पाहा सर्वेतून काय आले समोर...
- Goa Election: गोव्याची निवडणूक ही 'मिस्टर अॅन्ड मिसेस'ची; पाच जोड्या निवडणुकीच्या रिंगणात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA