Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Elections) वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांसोबत बैठका, मेळावे, वरिष्ठ नेत्यांचे दौरे यांसारखे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. सर्व पक्षांसोबतच काँग्रेसनंही 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. 2014 आणि 2019 मधील पराभवातून धडा घेत काँग्रेस (Congress) काही नवी रणनीती घेऊन मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये रायबरेली  (Raebareli) आणि अमेठी लोकसभा जागांच्या (Amethi Lok Sabha Seat) संदर्भातील काँग्रेसच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दोन्ही जागा म्हणजे, काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या रायबरेलीच्या खासदार आहेत.


अशा परिस्थितीत काँग्रेस यावेळी अमेठीतून उमेदवार देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय सोनिया गांधी पुन्हा एकदा रायबरेलीतून निवडणूक लढवणार की, त्यांच्या ऐवजी कन्या आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. अशातच प्रियंका गांधी रायबरेलीतून उमेदवार झाल्या तर त्या जिंकू शकतील का? याबाबत सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे.


सी-व्होटरनं सर्वेत (ABP C Voter Survey) सहभागी करण्यात आलेल्या लोकांना याबाबत प्रश्न विचारले. प्रियांका गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवली तर त्या जिंकतील का? असा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना विचारण्यात आला. लोकांनी या प्रश्नाला जी उत्तरं दिली, ती खरंच धक्कादायक आहेत. सर्वेक्षणात 49 टक्के लोकांनी प्रियांका गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवल्यास, त्या जिंकतील असं म्हटलं आहे. तसेच, 42 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. याशिवाय 9 टक्के लोकांनी 'माहित नाही' असं उत्तर दिलं आहे.


प्रश्न : रायबरेली मतदारसंघातून प्रियांका गांधींनी निवडणूक लढवल्यास, त्या जिंकतील? 


हो : 49 टक्के
नाही : 42 टक्के
माहित नाही : 9 टक्के


दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत प्रियांका गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यांना हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्यात येईल असं म्हटलं जात आहे. अद्याप या निर्णयावर काँग्रेसकडून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ABP C Voter Survey: भ्रष्टाचाराच्या आरोपात कर्नाटकात भाजपचा पराभव; पंतप्रधान मोदी 'करप्शन फ्री इमेज' राखू शकतील? जनतेचं म्हणणं काय?