ABP C Voter Survey: कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election 2023) काँग्रेसनं (Congress) भाजपवर (BJP) '40 टक्के कमीशन सरकार' म्हणत भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of Corruption) करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. त्यामुळे कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसला दणदणीत विजय मिळाल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना राष्ट्रीय स्तरावर आव्हान देणं काँग्रेससाठी कठीणच आहे. याबाबत 'एबीपी माझा' असा दावा करत नसून, एका सर्वेक्षणातूनच ही बाब समोर आली आहे.


केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एबीपी न्यूज आणि सीव्होटरनं सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा सर्व्हे अशावेळी समोर आला आहे, जेव्हा कर्नाटकात नुकताच भ्रष्टाचाराच्या आरोपात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. जाणून घेऊया या नव्या सर्वेक्षणात देशाचा मूड काय आहे?


पंतप्रधान मोदी आपली भ्रष्टाचारमुक्त प्रतिमा राखू शकतील?


सर्वेक्षणात सहभागी लोकांना प्रश्न विचारण्यात आलं की, विरोधकांच्या आरोपांनंतरही पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचारमुक्त प्रतिमा राखण्यात यश आलं आहे, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाच्या उत्तरात 54 टक्के लोकांनी होकारार्थी संमती दर्शवली आहे. तसेच, 37 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पंतप्रधान मोदींचं नुकसान होईल. यासोबतच 9 टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीही बोलू शकत नाही हा पर्याय निवडला.


मित्रपक्ष सोडतायत एनडीएची साथ?


अलिकडच्या काळात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या अनेक मित्रपक्षांनी वेगळा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एबीपी न्यूज आणि सीव्होटरच्या सर्वेक्षणात यासंबंधीचा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. तुमच्या मते मित्रपक्षांनी एनडीएची साथ सोडली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 


या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या 37 टक्के लोकांना वाटतं की, मित्र पक्षांनी एनडीए सोडण्याचं कारण भाजप नेत्यांचा अहंकार आहे. तसेच, एनडीएमध्ये असताना मित्रपक्षांना त्यांच्या अस्तित्वाला धोका वाटत होता, असं 33 टक्के लोकांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी युती सोडली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 17 टक्के लोकांनी कारण म्हणून इतर कारणं सांगितली आणि 13 टक्के लोकांनी नाही म्हणण्याचा पर्याय निवडला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ABP C Voter Survey:  पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेक्षणात समोर आला लोकांचा कौल