ABP C-Voter Survey: राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण याबाबत केलेल्या सर्वेक्षणात जनेतेने देखील शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाजून कौल दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP) पडलेल्या फूटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ माजली. पक्षामध्ये बंड करुन अजित पवारांसह अनेक आमदार शिंदे आणि भाजपच्या सरकारमध्ये सामील झाले.


त्यानंतर अनेक दावे प्रतिदावे राजकीय नेत्यांकडून होत आहेत. यातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला असून स्वत:ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. 


त्यामुळे आता सत्तासंघर्षाच्या या लढाईमध्ये राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे. दरम्यान आता या लढाईमध्ये कोणाची सरशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोणी असावं या संदर्भात सी- वोटरने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर या सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा देखील समोर आला आहे. 


कोण आहे राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष?


सी - वोटरने केलेल्या या सर्वेक्षणातून राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण आहे असं तुम्हाला वाटतं हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना 66 टक्के लोकांनी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर केवळ 25 टक्के लोकांनी अजित पवारांच्या बाजून कौल दिला आहे. तर नऊ टक्के लोकांनी यावर सांगता येत नाही असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे यावरुन हे स्पष्ट होतं की पक्षातील बंडानंतर देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून लोकांचा कौल शरद पवारांकडेच आहे. 


तुमच्या मते राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण? 
शरद पवार - 66 टक्के 
अजित पवार - 25 टक्के
सांगत येत नाही - 9 टक्के 


तसेच अजित पवारांकडून शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर शरद पवार यांच्याकडूनही या दाव्यांवर चोख उत्तर देण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या महराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणांनंतर दावे प्रतिदाव्यांचं सत्र सुरु आहे. 


याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या तिघांमध्ये बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाली. पण चर्चामध्ये कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले हे मात्र अधिकृतपणे अद्यापही समोर आलेले नाही. पण या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या कायदेशीर लढाई लढण्याबाबतही अजित पवारांनी अमित शाहांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.  


हे ही वाचा: 


Maharashtra Politics: शरद पवार गटासोबतची कायदेशीर लढाई, खातेवाटप अन् मंत्रिमंडळ विस्तार; अजित पवार, अमित शाह बैठकीची इन्साईड स्टोरी