ABP Cvoter Opinion Poll: कर्नाटक (Karnataka Eelection) विधानसभेच्या निवडणुका 10 मे रोजी पार पडणार असून 13 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. परंतु त्याआधी राज्यातील महत्त्वाचे पक्ष काँग्रेस (Congress), भाजपा (BJP) आणि जेडीएस (JDS) यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक मुद्द्यांमुळे कर्नाटकांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत आल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच काँग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप या निवडणूकांमध्ये बघायला मिळत आहे. 


कर्नाटकात सध्या दोन राजकीय मुद्दे दिसत आहेत. पहिला- भाजप सरकारवर 40 टक्के कमिशनचा काँग्रेसने केलेला आरोप आणि दुसरा- पीएफआय व्यतिरिक्त बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या घोषणेवर भाजपचा आरोप. 


'बजरंगबली की जय'च्या घोषणा, त्यांचे मुखवटे आणि झेंडे भाजपच्या प्रचारात दिसून आले. बजरंग दलाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनीही काँग्रेसला चांगलेच सुनावले असल्याचं चित्र पाहायला मिळालं. निवडणुकीपूर्वी 6 मे रोजी काँग्रेसने आणखी एक मोठा हल्ला केला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला आहे की, चित्तापूर मतदारसंघातील भाजप उमेदवाराने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या हत्येचा कट रचला होता.


मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  13 मे रोजी होणारी मतमोजणी विजय-पराजय ठरवेल, मात्र त्याआधी झालेल्या अंतिम जनमतच्या सर्वेक्षणातून राज्यात पुढचे सरकार कोणाचे स्थापन होणार याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


'एबीपी न्यूज' गेल्या अनेक आठवड्यांपासून राज्यातील जनतेची मनस्थिती समजून घेत आहे. एबीपी न्यूजसाठी, सीव्होटरने गेल्या 12 आठवड्यांत 73,774 लोकांशी संवाद साधला. 29 एप्रिलला शेवटचा ओपिनियन पोल दाखवल्यानंतर 6,420 लोकांची मते घेण्यात आली आहेत


सी-व्होटरने राज्यातील सर्व 224 जागांवर हे सर्वेक्षण केले आहे. यात त्रुटी उणे 3 ते  उणे 5 टक्के आहे. अखेर कर्नाटकात कोणाचे सरकार स्थापन होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कामावर जनता खूश आहे की नाराज, जाणून घेऊया अंतिम जनमत सर्वेक्षणातील 10 महत्त्वाच्या गोष्टींमधून. 


कर्नाटकात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?


सोर्स- सी-वोटर
एकूण जागा - 224 
भाजपा - 73 ते 85 जागा
काँग्रेस - 110 ते 122 जागा
जेडीएस - 21 ते 29 जागा
इतर - 02 ते 06 जागा


कर्नाटकात कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळू शकतात? 


सोर्स- सी-वोटर
एकूण जागा - 224 
भाजपा - 36 टक्के
काँग्रेस - 40 टक्के
जेडीएस - 16 टक्के
इतर - 08 टक्के


कोण विजयी होईल?


सोर्स- सी-वोटर
एकूण जागा - 224 
भाजपा - 32 टक्के
काँग्रेस - 44 टक्के
जेडीएस -  15 टक्के
त्रिशंकु - 4 टक्के
इतर - 2 टक्के
माहित नाही - 3 टक्के


सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता?


सोर्स- सी-वोटर
बेरोजगारी - 31 टक्के
मूलभूत सुविधा - 27 टक्के
कृषी - 15 टक्के
भ्रष्टाचार - 9 टक्के
कायदे व्यवस्था - 3 टक्के
इतर -  15  टक्के


मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा आवडेल? 


सोर्स- सी-वोटर
बोम्माई - 31 टक्के
सिद्धारमैया - 42 टक्के
कुमारस्वामी - 21 टक्के
डीके शिवकुमार - 3 टक्के
इतर - 3 टक्के


पंतप्रधान मोदींचे काम कसे आहे? 


सोर्स- सी-वोटर
चांगले - 48 टक्के
सरासरी - 19 टक्के
वाईट - 33 टक्के


मुख्यमंत्री बोम्माईंचे काम कसे आहे?


सोर्स- सी-वोटर
चांगले - 26  टक्के
सरासरी - 24 टक्के
वाईट - 50 टक्के


राज्य सरकारचे काम कसे आहे? 


सोर्स- सी-वोटर
चांगले - 29  टक्के
सरासरी - 21 टक्के
वाईट - 50 टक्के


केवळ कर्नाटकच्या किनारी भागात भाजप मजबूत आहे, जनतेने दिला असा कौल?


सोर्स- सी-वोटर
एकूण जागा - 21
भाजपा - 13 ते 17 जागा
काँग्रेस - 4 ते 8 जागा
जेडीएस - 0-0 जागा
इतर - 0-0 जागा


कर्नाटकाच्या किनारी भागात कोणत्या पक्षाला किती टक्के मतदानाचा वाटा मिळेल? 


सोर्स- सी-वोटर
एकूण जागा - 21
भाजपा - 46 टक्के
काँग्रेस - 37 टक्के
जेडीएस - 8 टक्के
इतर - 9 टक्के


गेल्या आठवड्यात प्रसारित झालेल्या 'फायनल ओपिनियन पोल' आणि 'ओपिनियन पोल' या दोघांचे आकडे काँग्रेसची बाजू भक्कम असल्याचं दाखवत आहेत. एबीपी न्यूजसाठी घेण्यात आलेल्या सी-व्होटरच्या ओपिनियन पोलचे निकाल 29 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले. त्यानंतर कर्नाटकातील 224 जागांपैकी 107 ते 119 जागा काँग्रेसच्या बाजूने, 74 ते 86 जागा भाजपच्या खात्यात आणि 23 ते 35 जागा जेडीएसच्या बाजूने जातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी 0 ते 5 जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे या माध्यमातून सांगण्यात येत आहे.