LIVE UPDATE | खारघर येथे तरुणीवर शिक्षकाने केला बलात्कार
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. अयोध्या प्रकरणाची आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता, दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांचा वेळ, सरन्यायाधीशांच्या भूमिकेकडे लक्ष
2. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार, भाजपच्या संकल्पपत्रात घोषणा, विरोधकांकडून टीका
3. दाऊदचा हस्तक इकबाल मिर्चीसोबत कथित व्यवहाराप्रकरणी प्रफुल्ल पटेलांना ईडी नोटीस, 18 तारखेला चौकशी, गैरव्यवहार झाला नसल्याचं पटेलांकडून स्पष्ट
4. नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन, संयमानं आणि सबुरीनं घेण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, तर निलेश राणेंची शिवसेनेविरोधात आगपाखड सुरुच
5. नाशिकमध्ये शिवसेनेच्या सर्व 36 नगरसेवकांचा राजीनामा, नाशिक पश्चिमच्या भाजप उमेदवार सीमा हिरेंची डोकेदुखी वाढली, सेनेचाही बंडखोरांच्या सुरात सूर
6. पंतप्रधान मोदींच्या उद्या होणाऱ्या सभेपूर्वी पुण्यातल्या एसपी कॉलेजमधल्या झाडांवर कुऱ्हाड, विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी झाडं तोडल्याचा कॉलेज प्रशासनाचा दावा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -