LIVE BLOG : मुंबईत विक्रोळीमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कंटेनरने चिरडलं
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 Jun 2019 10:36 PM
ठाणे : मुलगी दहावीत पास झाल्याच्या आनंदात आणलेल्या पेढ्यांमधून सात जणांना विषबाधा, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु दाखल, सर्वांची प्रकृती स्थीर, ठाण्यातील संभाजीनगर येथील घटना
नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वडाळा गावातील घराची भिंत कोसळून एकाच घरातील 3 जण जखमी, मेहबूबनगर परिसरातील घटना
वर्धा : सलग तिसऱ्या दिवशी वर्ध्यात वादळाचा तडाखा, वादळादरम्यान जोरदार पावसाची हजेरी, संध्याकाळी कारंजा, पिंपळखुटा, खरांगना परिसरात जोरदार पाऊस
पंतप्रधान मोदींचं मालदीवच्या संसदेत भाषण, मालदीवकडून मोदींना गार्ड ऑफ ऑनर
दहावीत नापास झाल्याने दोन विद्यार्थीनींची आत्महत्या, अकोल्यात संजना नावकार या विद्यार्थीनीची तर परभणीत सुरेखा जाधव या विद्यार्थीनीची आत्महत्या
जळगाव : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास, अनेकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु, जवळपास 50 रुग्ण दाखल झाले असून रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता
नाशिकमध्ये पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, सोसाट्याचा वारा आणि वि0जांच्या कडकडाटासह नाशिक शहरात पावसाला सुरुवात
पणजी : मिग 29 के विमानाची इंधनाची टाकी कोसळून तिने पेट घेतल्याने गोव्यातील दाबोळी विमानतळ दोन तासांसाठी बंद करण्यात आले आहे. हवाई दलाचं मिग 29K या विमानाची वेगळी होऊ शकणारी इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळली. त्यानंतर आग लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दाबोळी विमानतळ काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका पुन्हा एव्हीएममार्फत घेतल्या तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सूनचे आगमन, हवामान विभागाची माहिती
नवी मुंबई - नेरुळ आणि जुईनगर रेल्वेस्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी: दाभोळ खाडीत दोन संशयित बोटी, चीन आणि इंडोनेशियाच्या बोटी असल्याचा संशय
आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार
आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानात 26 एप्रिल रोजी जन्मलेल्या वाघाच्या चार बछड्यांचं नामकरण; अर्पिता, देविका, प्रगती आणि कुश अशी बछड्यांची नावं
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानात 26 एप्रिल रोजी जन्मलेल्या वाघाच्या चार बछड्यांचं नामकरण; अर्पिता, देविका, प्रगती आणि कुश अशी बछड्यांची नावं
नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबळी करण्याच्या कारणावरुन झालेल्या हाणामारी प्रकरणी पुरोहित संघाच्या अध्यक्षासह 17 पुरोहितांवर गुन्हा दाखल
पालघर : सुट्टीनिमित्त डहाणू इथे आलेल्या बुलडाण्यातील मुलीचा नदीत बुडून अंत झाला. दहावीच्या निकालाच्या एक दिवस आधी म्हणजेच 7 जून रोजी तिला मृत्यूने कवटाळल्याची घटना डहाणू तालुक्यातील कासा इथे घडली.
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. आज महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल, विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली, दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार
2. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे फोन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप, राष्ट्रवादीऐवजी वंचितशी हातमिळवणी करण्याचे संकेत
3. मंत्रालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका, दुपारी अर्धा तासात जेवण उरकण्याचे आदेश, नागरिकांच्या सोयीसाठी सरकारचा जीआर
4. पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क, घटस्फोट प्रकरणातील पोटगीची रक्कम ठरवताना दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
5. पुढच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला बलिदान बॅज असलेले ग्लोव्ज बदलावे लागणार, बीसीसीआयची विनंती आयसीसीने फेटाळली
6. अमेरिकेतल्या चॅरिटी म्युझिक शोमध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस लूक, मिसेस सीएमनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस