LIVE BLOG : विक्रम लॅण्डरकडून डेटा मिळण्यात तांत्रिक अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Sep 2019 02:15 AM
विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटल्यानंतर आम्ही वाट पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया इस्रोकडून देण्यात आली आहे.
विक्रम लॅण्डरकडून लोकेशन मिळत नसल्याने इस्रोसमोर अडचण,
शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर चिंता
विक्रम लॅण्डरकडून लोकेशन मिळत नसल्याने अडचण,
डेटा मिळण्यात तांत्रिक अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती
रफ ब्रेकिंग आणि फाईन ब्रेकिंग यशस्वी : इस्रो,
काही क्षणात चांद्रयान चंद्रावर उतरणार
विक्रम लॅण्डर चंद्राच्या जवळ,
काहीच क्षणात चांद्रयान चंद्रावर उतरणार
चांद्रयानाचा वेग कमी करण्यात यश,
लॅण्डिंगचा पहिला टप्पा यशस्वी,
यान चंद्रापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर
चांद्रयान चंद्रावर उतरवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात,
यानाचा वेग 6000 किमी प्रतितासवरुन कमी होऊ लागला आहे
काऊंटडाऊन सुरु, अर्ध्या तासात #चांद्रयान चंद्रावर उतरणार
नागपूर : अॅक्सिस बँकेची कॅश घेऊन जाणारी गाडी पलटी, नागपूर-अमरावती मार्गावर तळेगावजवळ सत्याग्रही घाट शिवारातील घटना, स्टेअरिंग लॉक झाल्याने अपघात, पोलिसांनी साडेचार कोटींची कॅश सुरक्षित परत नेल्याची माहिती
कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरण, सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत आणि इतर दोघे साक्षिदार, आद्याप कोणालाही अटक नाही, सातारा पोलिसांची माहिती
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा नागपूर दौरा रद्द, मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दौरा रद्द, नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती
एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, मिलिंद देवरा यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांनी स्वीकारला
एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, मिलिंद देवरा यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांनी स्वीकारला
मुंबई : काँग्रेससाठी नॉट-रीचेबल असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
#नंदुरबार : शहादा तालुक्यातील वडछिल गावात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
सहाही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश
औरंगाबाद : एमआयएम आणि वंचित आघाडीमध्ये फूट, एमआयएम विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार, इम्तियाज जलील यांची घोषणा
रत्नागिरी: रत्नागिरी-कोल्हापूर आंबाघाटात दरड कोसळली, दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु
कोल्हापूर | कॉ गोविंद पानसरे हत्या प्रकरण

- पोलीस अधिकाऱ्याने छळ केल्याचा आरोपी

सचिन अंदुरेचा न्यायालयात धक्कादायक खुलासा

, सीबीआय कोठडीत छळ केल्याचा आरोप, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार

, आरोपी सचिन अंदुरे याची न्यायालयात माहिती
राजू शेट्टी पोहचले ईडी कार्यालयात,
कडकनाथ कोंबडी प्रकरणी ईडीकडून चौकशीची करणार मागणी

राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक 9 सप्टेंबरला भाजपात प्रवेश करणार, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाशीत जाहीर कार्यक्रमात प्रवेश करणार, राष्ट्रवादीचे 50 आणि अपक्ष 5 नगरसेवक आज वेगळा गट स्थापन करणार

पार्श्वभूमी

1. चांद्रयान मोहिमेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, मध्यरात्री चंद्रयान चंद्रावर उतरणार, ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी मोदी इस्रोच्या सेंटरमध्ये उपस्थित राहणार

2. मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट कायम, 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

3. मुख्यमंत्रिपदाबद्दल उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, मुंबईतल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकत्र येणं टाळलं, चर्चांना उधाण

4. मोदी हे सर्वात प्रभावशाली पंतप्रधान, एबीपी माझा आणि सी-व्होटरचा सर्व्हे, सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शाह सर्वात लोकप्रिय मंत्री

5. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ ते १२ हजारांपर्यंत वाढ होण्याची शक्यता, वेतनकराराबाबत बेस्ट कृती समिती मात्र नाराज, वीज कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ

6. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार किरण नगरकर यांचं निधन, वयाच्या 77 व्या वर्षी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.