LIVE BLOG : काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरांचा राजीनामा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jul 2019 07:46 PM
#Breaking | पालघर जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत, 6 तालुके अंधारात, डहाणू , तलासरी , विक्रमगडमध्ये वीज पुरवठा खंडीत
महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे आदेश,ब्रिटीश कालीन इमारतीचा काही भाग आज कोसळल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली
काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरांचा राजीनामा
नाशिक शहरातील पाणीकपात रद्द , पाणीपुरवठा विभागाचा निर्णय, 30 जुलै पासून शहरात पाणीपुरवठा पुर्ववत होणार
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ कॉंग्रेसच्या दोन आमदारांची मुलाखतीला दांडी, पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रेंची मुलाखतीला दांडी , कॉंग्रेसचे दोन्ही आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा
पीक विम्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढ , शेतकऱ्यांना दिलासा, 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
नाशिक महानगरपालिकेच्या कार्यालयाचा भाग कोसळला, नाशिक महानगरपाकेच्या पूर्व विभागीय कार्यलयाला तडा, तडा गेल्याने काही भाग कोसळला, धोकादायक वाड्यांना नोटिसा देणार कार्यालयच धोकादायक
मुंबई : गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्यास रेल्वेची परवानगी, अमित ठाकरेंच्या मागणी रेल्वेचा निर्णय
गडचिरोली : शिकारीच्या शोधात बिबट्याचा विद्युत झटक्याने मृत्यू, गडचिरोलीतील देसाईगंज तालुक्यातील एकलपूर जवळील घटना

नाशिक : दारणा पाठोपाठ गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार,
दुपारी 2 वाजता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा : राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजेंच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सुरू, बैठकीत कार्यकत्यांचा भाजपचा नारा, शिवेंद्रराजेंचा येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई : राज ठाकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार, मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घरी भेटीला
कर्नाटकात बहुतम सिद्ध कऱण्यात येडियुरप्पांना यश आलं आहे. येडियुरप्पांनी शुक्रवारी संध्याकाळी चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटक विधानसभा अध्य़क्ष के आर. रमेशकुमार यांनी 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे भाजपकडे सध्या संख्याबऴ 105 तर, काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 100 आहे.
अमरावती : मेळघाटमध्ये मुसळधार पावसाने सिपणा नदीला पूर, हरिसालजवळील पुरावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद, परतवाडा -खंडवा महामार्ग बंद
नवी दिल्ली : भारतात वाघांची संख्या वाढली, देशभरात सध्या 2967 वाघ, चौथ्या व्याघ्रगणनेचे आकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर
सांगली आणि जयसिंगपूर शहरातील भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकाच्या एटीएममध्ये 50 लाखांचा घोटाळा, रोकड एटीएममध्ये न भरता परस्पर हडप, सीएमएस इन्फो सिस्टम्स लि. या कंपनीच्या दोन कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : पुण्यात घोरपडे पेठेत तीन मजली जुन्या इमारतीचा भाग कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही, सर्व रहिवाशांना बाहेर काढलं, इमारतीत 20 ते 25 नागरिक राहत होते
कल्याण, डोंबिवलीचा पाणी पुरवठा पूर्ववत, मोहने आणि मोईली पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीचे काम पूर्ण
कर्नाटकात येडियुरप्पा सरकराची आज बहुमत चाचणी, भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा
कर्नाटकात येडियुरप्पा सरकराची आज बहुमत चाचणी, भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा
मुंबई : राजू शेट्टी यांनी नारायण राणेंची घेतली भेट घेतली, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन नेत्यांमधील भेट महत्त्वाची

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांसह, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकरांचा पवारांना टोला

2. मराठवाडा, विदर्भातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर, सरकारच्या दफ्तर दिरंगाईचा बळीराजाला फटका, 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार

3. विधानसभेच्या तोंडावर औरंगाबादेत एमआयएमचं जोरदार शक्तिप्रदर्शन, खासदार इम्तियाज जलील यांची विराट विजयी रॅली, हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी

4. कल्याण-बदलापुरातील महापुराची दाहकता, शेकडो संसार चिखलात बुडाले, तर रायता गावात 23 गायींचा मृत्यू

5. नाट्यरसिकांच्या गलथानपणामुळे अभिनेता सुबोध भावे संतापला, फेसबूकवरुन नाटकात काम न करण्याचा इशारा, प्रेक्षकांकडून होणाऱ्या मोबाईल वापरावर टीका

6. फसवणूक केल्यानं ट्रक ड्रायव्हरला मालकाकडून अमानूष मारहाण, उलटा टांगून अमानवी छळ, नागपूरच्या वडधामना परिसरातील धक्कादायक प्रकार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.