LIVE UPDATE | रस्ते, शिक्षण, पायभूत सुविधा हव्या असतील तर दलबदलूंना घरी बसवा : राज ठाकरे
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
12 Oct 2019 11:02 PM
राज्य सरकार 30% सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार, उद्योगधंदे बंद होत आहेत आणि सरकारी नोकर पण नोकऱ्या गमावत आहेत, भाजपची घोषणा होती 2014 ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? : राज ठाकरे
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील आणि काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकलेली बदनामीकारक पोस्ट, महाडिक-पाटील गटातील सोशल वॉर पोलीस ठाण्यापर्यंत
चांगले रस्ते, चांगलं शिक्षण, चांगल्या पायभूत सुविधा, अशा अनेक गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर ही संधी आहे तुम्हाला ह्या सगळयांना घरी बसवा
ठाणे : भाजप उमेदवाराच्या रॅलीत भाजप नगरसेवक आणि नगरसेविकेच्या पतीमध्ये हाणामारी, कृष्णा पाटील, भाजप नगरसेवक आणि भाजप नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड यांच्यात हाणामारी, भाजप उमेदवार संजय केळकर यांच्या रॅलीत कोलबाड येथील प्रकार
ठाणे : भाजप उमेदवाराच्या रॅलीत भाजप नगरसेवक आणि नगरसेविकेच्या पतीमध्ये हाणामारी, कृष्णा पाटील, भाजप नगरसेवक आणि भाजप नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड यांच्यात हाणामारी, भाजप उमेदवार संजय केळकर यांच्या रॅलीत कोलबाड येथील प्रकार
आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, गावात लोकांच्या मनात राग आहे पण हा राग कुठे व्यक्त करायचा, आम्ही लोकांना आवाहन करतोय की आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून येण्यासाठी मतदान करा. रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही होतोच आज विधानसभेतील विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे
पुणे : खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, चंदननगर पोलिसांची कारवाई, जितेंद्र शिवराम मोहिते, कुमार यशवंत सावंत आणि योगेश यशवंत सावंत अशी अटक आरोपींची नावे
चांगले रस्ते, चांगलं शिक्षण, चांगल्या पायभूत सुविधा, अशा अनेक गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर ही संधी आहे, तुम्हाला सर्व दलबदलूंना घरी बसवा : राज ठाकरे
बीड : पंकजा मुंडे यांना धक्का, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
हमी घेऊ शकत नसाल तर बँकांना परवानगी का देता? राज ठाकरेंचा सवाल
कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस, राज ठाकरेंच्या सभेवर पावसाचं सावट, हवामान खात्याने दिलेला इशारा, पुढील 4 तासात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा
खड्ड्यांवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर आसूड
औरंगाबाद : औरंगाबाद मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दिकी आणि जावेद कुरेशी यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, औरंगाबाद पैठण गेटवरील घटना, जावेद कुरेशी यांची रॅली जात असताना एमआयएममध्ये नाराज असलेले जावेद कुरेशी यांच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराविरोधात घोषणाबाजी दिल्याने गोंधळ
कणखर विरोधीपक्ष नसल्यामुळे सरकारं बेफाम होतात,
म्हणून माझ्या हातात विरोधीपक्षाची सूत्र द्या : राज ठाकरे
पंढरपूर : मंगळवेढ्याच्या माजी आमदार किसनलाल मर्दा यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत मर्दा यांना अटक, गर्भपात करताना अटक, छापा टाकून कारवाई, गर्भपाताबाबत मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
भिवंडीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा सुरु
राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45 लाख 81 हजार 884 युवती आहेत. 611 तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.
राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 8 कोटी 99 लाख 36 हजार 261 मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण 5 हजार 560 अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष 4 हजार 54 आहेत तर 1 हजार 506 अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.
नाशिक : इगतपुरी-त्रंबकेश्वर मतदारसंघातील बर्ड्याच्या वाडीतील ग्रामस्थांचा मतदानवर बहिष्कार. पिण्याचे पाणी, शौचालय, वीज अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने निर्णय
सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा (2019) विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर
मंगळवेढ्यात गर्भपाताचे मोठे रॅकेट उघड , पोलिसांचा छापा , गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु, कारवाईबाबत पोलिसांनी बाळगलीय मोठी गुप्तता
शिवसेनेचा वचननामा प्रकाशित | दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी : उद्धव ठाकरे
मुंबईत बारा तासात 63 लाखांची संशयित रक्कम पकडली, निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाने गेल्या 12 तासात तब्बल 63 लाखांची संशयित रक्कम पकडली आहे. काल सायंकाळी भायखळा भागात 58 लाख 58 हजार रुपये पकडण्यात आले आहेत. तर आज सकाळी धारावी भागात 4 लाख 51 हजार रुपये पकडण्यात आले आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा आणि धारावी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
पार्श्वभूमी
1.राष्ट्रवादीतील वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक, तोंडी परिक्षेत अजितदादांचा कबुलीनामा तर वेगळ्या विदर्भावरुन मुख्यमंत्र्यांबाबत गौप्यस्फोट
2. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कोणतीही दुर्घटना झाली नाही, भाजपचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
3. कलम-370 वर बोलणारे अमित शाह शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर गप्प का, सरकारवर आसूड ओढताना राज ठाकरेंचा सवाल, खड्ड्यांवरुनही हल्लाबोल
4. महाराष्ट्रातल्या प्रचारासाठी सोनिया आणि प्रियकांना काँग्रेस नेत्यांचं साकडं, मनमोहन सिंग यांच्याही संवादाचा कार्यक्रम ठेवणार, थोरातांची माझाला माहिती
5. तामिळनाडूच्या महाबलीपूरममध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांचं जंगी स्वागत, लुंगी नेसून मोदींची जिंगपिंग सोबत मंदिराची सफर
6. पुणे कसोटीत कोहलीचं विराट द्विशतक, कर्णधार म्हणून 19 शतकांसह पॉन्टिंगच्या रेकॉर्डशी बरोबरी, पहिल्या डावात भारताचा 601 धावांचा डोंगर